Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 Auction: आला रे! अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये खेळणार 'या' संघाकडून

IPL 2021 Auction: आला रे! अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये खेळणार ‘या’ संघाकडून

अर्जुन मागील काही मोसमांमध्ये मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसायचा.

Related Story

- Advertisement -

आयपीएल स्पर्धेचा खेळाडू लिलाव शुक्रवारी पार पडत आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रिस मॉरिस यांच्यावर मोठी बोली लागली. तसेच भारताच्या युवा खेळाडूंमध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला कोणता संघ खरेदी करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अर्जुनची मूळ किंमत (बेस प्राईज) २० लाख रुपये इतकी ठेवण्यात आली होती आणि त्याला मूळ किमतीवरच मुंबई इंडियन्सने खरेदी केले. अर्जुन मागील काही मोसमांमध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसायचा. त्यामुळे त्याला मुंबई खरेदी करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. तो डावखुरा वेगवान गोलंदाज असून फलंदाजी करण्याचीही त्याच्यात क्षमता आहे.

अर्जुनने काही दिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पदार्पण केले होते. त्यामुळे तो आयपीएल खेळाडू लिलावात सहभागी होण्यासाठी पात्र ठरला. अर्जुनने हरियाणाविरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून मुश्ताक अली स्पर्धेत पदार्पण केले. या सामन्यात त्याला खाते उघडता आले नाही, पण गोलंदाजीत त्याने १ विकेट घेतली. तसेच वानखेडे येथे झालेल्या पुदुच्चेरीविरुद्धच्या सामन्यात त्याने ३३ धावांत १ विकेट घेतली. फलंदाजीत मात्र तो पुन्हा अपयशी ठरला.

- Advertisement -

- Advertisement -