घरक्रीडामुंबई इंडियन्सने 22 वर्षीय खेळाडूंला दिली अजब-गजब शिक्षा; विमानतळावरील Video व्हायरल

मुंबई इंडियन्सने 22 वर्षीय खेळाडूंला दिली अजब-गजब शिक्षा; विमानतळावरील Video व्हायरल

Subscribe

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल 2023 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. परंतु या संघाने अवघ्या 22 वर्षीय खेळाडू अशी शिक्षा दिली की तो त्याला शिक्षा दिली की लोकांनाही या खेळाडूला विमानतळावर अशा अवस्थेत पाहून हलून आवरत नव्हते. या शिक्षेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेहल वधेरा (Nahel Wadhera) हा 22 वर्षीय खेळाडू गेल्या काही सामन्यांपासून मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी करत आहे. परंतु त्याने एक चूक केली आणि त्याला शिक्षेला सामोरे जावे लागले. प्रत्येक संघाचे काही नियम असतात आणि या नियमांचे त्या संघातील खेळाडूंना पालन करावे लागते. परंतु मुंबई इंडियन्सच्या संघात जरा जास्तच कडक शिस्त पालन करावे लागते आणि या कडक शिस्तीचा नेहल वधेरा बळी पडला आहे.

- Advertisement -

वधेराला काय दिली शिक्षा?
मुंबई इंडियन्सच्या संघाने एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व खेळाडूंना वेळेवर येणे बंधनकारक होते. परंतु नेहल वधेरा उशिरा पोहचला आणि त्याला शिक्षा देण्यात आली. ही शिक्षा अशी होती की, वधेराने विमानतळावर पॅड घालून चालावे. ही शिक्षा ऐकून सर्वच हैराण होणार कारण विमानतळासारख्या ठिकाणी कपड्यांवर फक्त पॅड घालून चालणे सोपी गोष्ट नाही. पण या खेळाडूंने हे सहज केले आणि तिथे उपस्थित लोक त्याला पाहून हसत होते. ही शिक्षा सुरू असताना संघातील इतर खेळाडू त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे तो सर्वांची नजर चुकवत चालताना दिसत आहे. या शिक्षेचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर पेजवर अपलोड केला आहे आणि आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 43 हजार पाहिला आहे, तर अडीच हजार लोकांनी लाईक केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -