घरक्रीडामुंबई इंडियन्सने IPL2023 साठी केली नव्या मुख्य प्रशिक्षकांची निवड, 'हे' असतील नवे...

मुंबई इंडियन्सने IPL2023 साठी केली नव्या मुख्य प्रशिक्षकांची निवड, ‘हे’ असतील नवे प्रशिक्षक

Subscribe

 मुंबई – मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( IPL 2023) साठी नव्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केले. दक्षिण आफ्रिकेकडून विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या दिग्गज खेळाडूवर त्यांनी ही जबाबदारी सोपवली आहे. . दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने व झहीर खान यांच्याकडून आयपीएलमधील जबाबदारी काढून घेतली होती, त्यानंतर फ्रँचायझीच्या दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधील MI Cape Town संघाच्या कोचिंग स्टाफची घोषणा केली होती.

मुंबई इंडियन्सचा विस्तार वाढला असून या फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिका व युएई येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये संघ खरेदी केला आहे. त्यामुळे माहेला जयवर्धने व क्रिकेट डेव्हलपमेंट प्रमुख झहीर खान यांच्यावर Global Head of Performance व Global Head of Cricket Development ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आफ्रिकन लीगमधील MI Cape Town संघासाठी कोचिंग स्टाफची घोषणाही करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमला हा फलंदाज प्रशिक्षक असणार आहे, तर जेम्स पॅमेंटकडे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, रॉबिन पीटरसन जनरल मॅनेजर असणार आहे.

- Advertisement -

नवे प्रशिक्षक आणि माहेला जयवर्धनेंची कामगिरी –

मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज मार्क बाऊचर याची निवड केली गेली आहे. तर माहेला जयवर्धने  यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माहेला जयवर्धने याने २०१७मध्ये रिकी पाँटिंगनंतर मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती. पहिल्या वर्षात मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावले. त्यानंतर २०१९ व २०२० मध्ये जयवर्धनेच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने 2 जेतेपद पटकावले. आयपीएलमध्ये जेतेपद कायम राखणारा तो दुसरा संघ ठरला होता.

- Advertisement -

बाऊचरने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार नसल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिंमागे ४०० बळी टीपणारा पहिल्या खेळाडूचा विक्रम बाऊचरने केला आहे. ऑगस्ट २०१६मध्ये बाऊचरकडे स्थानिक संघ टायटन्सच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली गेली होती आणि प्रशिक्षणाचा अनुभव नसतानाही त्यांनी दोन वन डे कप व दोन ट्वेंटी-२० चॅलेंज चषक जिंकले. शिवाय सनफॉईल सीरीज ही चार दिवसीय सामन्यांची मालिकाही जिंकली होती.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -