घरक्रीडाIPL auction 2022 : मुंबई इंडियन्सची इशान किशनवर रेकॉर्डब्रेक बोली, तब्बल मोजले...

IPL auction 2022 : मुंबई इंडियन्सची इशान किशनवर रेकॉर्डब्रेक बोली, तब्बल मोजले १५.२५कोटी

Subscribe

आयपीएल २०२२ च्या लिलाव प्रक्रियेला शनिवारी बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात आली. तर काही खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. श्रेयस अय्यरनंतर आयपीएलच्या लिलावातील सुपर जायंट किलर इशान किशन ठरला आहे. इशानला मुंबई इंडियन्स या संघाने तब्बल १५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलाव प्रक्रियेत इशान किशन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
मुंबईकर श्रेयस अय्यरची अपक्षेप्रमाणे २ कोटी मूळ किंमत होती. मात्र, अय्यरला कोलकाता नाईट रायडर्स संघाने १२.२५ कोटींना खरेदी केले. मुंबई इंडियन्सने इशान किशनला पु्न्हा एकदा रिटेन केले. पंजाब किंग्सने त्याच्यावर ६ कोटींसाठी बोली लावली. मात्र, गुजरात टायटन्सने त्याला १० कोटींमध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चुरस लागल्यानंतर शेवटी मुंबई इंडियन्सने बाजी मारत १५.२५ कोटींमध्ये त्याला खरेदी केले.

दुसरा भारतीय खेळाडू

इशान किशन आयपीएल लिलावाच्या इतिहासात सर्वाधिक बोली लागणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. युवराज सिंह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. युवराज सिंहवर 16 कोटी रुपयांची बोली लागली होती. तर आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने लावलेली ही सर्वाधिक बोली आहे. मुंबईने 10 कोटींपेक्षा जास्त बोली कधीही लावली नव्हती.

- Advertisement -

संघ आणि घेतलेले खेळाडू

१) दिल्ली कॅपिटल्स – मिशेल मार्शची (६.५० कोटी), डेविड वार्नर (६.२५ कोटी)
२) कोलकाता नाईट रायडर्स – श्रेयस अय्यर (१२.२५ कोटी), पॅट कमिंस (७.२५ कोटी), नितीश राणा (८ कोटी)
३) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – हर्षल पटेल (१०.७५), वानिंदु हसरंगा (१०.७५ कोटी), फाफ डू प्लेसीस (७ कोटी), दिनेश कार्तिक (५.५० कोटी)
४) चेन्नई सुपर किंग्ज – अंबाती रायडू (६.७५ कोटी), ड्वेन ब्रावो (४.४ कोटी), रॉबिन उथप्पा (२ कोटी)
५) राजस्थान रॉयल्स – शमरॉन हेटमायर (८.५० कोटी), ट्रेण्ट बोल्ट (८ कोटी), आर अश्विन (५ कोटी), देवदत्त पडीकल (७.५० कोटी)
६) सनरायझर्स हैदराबाद – वॉशिन्टन सुंदर (८.७५ कोटी)
७) पंजाब किंग्ज- कगिसो रबाडा (९.२५ कोटी), शिखर धवन (८.२५ कोटी), जॉनी बेयरेस्टो (६.७५),
८) गुजरात टायटन्स- मोहम्मद शामी (६.२५ कोटी), जेसन रॉय (२ कोटी),
९) लखनऊ सुपर जायंट्स – कृणाल पांड्या (८.७५), जेसन होल्डर (८.७५ कोटी), मनीष पांडे (४.६० कोटी), दीपक हुड्डा (५.७५ कोटी), क्विंटन डी कॉक (६.७५ कोटी)

सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू

कोलकाता नाईट रायडर्स – श्रेयस अय्यर (१२.२५ कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – हर्षल पटेल (१०.७५), वानिंदु हसरंगा (१०.७५ कोटी)
पंजाब किंग्ज- कगिसो रबाडा (९.२५ कोटी)
लखनऊ सुपर जायंट्स – कृणाल पांड्या (८.७५), जेसन होल्डर (८.७५ कोटी)
सनरायझर्स हैदराबाद – वॉशिंन्टन सुंदर (८.७५ कोटी)

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -