Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा मुंबई महापौर चषक खो-खो

मुंबई महापौर चषक खो-खो

पश्चिम रेल्वे, शिर्सेकर्सची विजयी सुरुवात

Related Story

- Advertisement -

विद्यार्थी क्रीडा केंद्र, शिर्सेकर्स महात्मा गांधी अकादमी यांनी पुरुषांमध्ये, तर व्यावसायिक गटात पश्चिम रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका या संघांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेला विजयी सुरुवात केली. ही स्पर्धा गोरेगाव येथे सुरू आहे.

पुरुषांमध्ये शिर्सेकर्स महात्मा गांधी अकादमीने पराग स्पोर्ट्स क्लबचा १३-६ असा १ डाव आणि ७ गुणांनी पराभव केला. या सामन्याच्या मध्यांतराला शिर्सेकर्सकडे १३-३ अशी मोठी आघाडी होती. शिर्सेकर्सच्या जगदीश पटेल (३:१० मि. संरक्षण आणि २ गडी), नितेश रूके (२:५० मि. संरक्षण आणि २ गडी) यांनी चांगला खेळ केला. सरस्वती स्पोर्ट्स क्लबने स्वराज्य क्रीडा मंडळावर १७-७ अशी १ डाव आणि १० गुणांनी मात केली. सरस्वतीच्या राहूल जावळे (३ मि. संरक्षण), चैतन्य धुळप (३ मि. संरक्षण आणि ३ गडी) यांनी चमकदार कामगिरी केली. श्री सह्याद्री संघाने युवक क्रीडा मंडळाला ९-७ असे पराभूत केले. सह्याद्रीच्या दुर्वेश साळूंकेने (२:२० मि. संरक्षण आणि ४ गडी) याने चांगला खेळ केला. विद्यार्थी क्रीडा मंडळाने रंगतदार सामन्यात ओम युवा क्लबवर १६-१४ अशी मात केली. विद्यार्थीच्या जितेश नेवाळकर (१:००, १:५० मि. संरक्षण आणि ४ गडी), सुजय मोरे (२:४० मि. संरक्षण) यांनी उल्लेखनीय खेळ केला.

- Advertisement -

व्यावसायिक गटात पश्चिम रेल्वेने रिझर्व्ह बँकेचा १७-१५ असा २ गुण आणि १:५० मि. राखून पराभव केला. सागर मालप (२:००, १:३० मि. संरक्षण), नचिकेत जाधव (५ गडी) यांनी प. रेल्वेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई पोलिसांचे आव्हान १६-१५ असे परतवून लावले. महापालिकेच्या महेश शिंदे (१:३०, २ मि. संरक्षण आणि २ गडी), दुर्वेश साळूंके (१:४०, १:२० मि. संरक्षण आणि ६ गडी) यांनी अष्टपैलू कामगिरी केली. नेव्हल डॉकयार्डने माझगाव डॉकवर ११-८ अशी मात केली. बँक ऑफ इंडियाने मध्य रेल्वेचा १०-९ असा पराभव केला. विजयी संघाचे अनिकेत पोटे (२:१०, २:१० मि. संरक्षण आणि २ गडी), प्रयाग कनगुटकर (२:४०, ३ मि. संरक्षण), सतिश चाळके (६ गडी) चमकले.

- Advertisement -