Homeक्रीडाMUM VS JK : जम्मू-काश्मीरचा जलवा, 5 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह खेळणाऱ्या मुंबईचा केला...

MUM VS JK : जम्मू-काश्मीरचा जलवा, 5 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह खेळणाऱ्या मुंबईचा केला पराभव

Subscribe

भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याने जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक करत मुंबईला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र संघातील 5 आंतरराष्ट्रीय खेळाडू चांगली खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी जम्मू-काश्मीरने मुंबईचा 5 विकेट्सने पराभव करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केले.

मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याने जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक करत मुंबईला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र संघातील 5 आंतरराष्ट्रीय खेळाडू चांगली खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी जम्मू-काश्मीरने मुंबईचा 5 विकेट्सने पराभव करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. मुंबईकडून मिळालेल्या 205 धावांचे आव्हान जम्मू आणि काश्मीरने 49 षटकार पूर्ण केले. महत्त्वाचे म्हणजे मुंबईला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. यानंतर जम्मू आणि काश्मीरकडून सर्वाधिक 7 विकेट्स आणि पहिल्या डावात 20 धााव करणाऱ्या युधवीर सिंगला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. (Mumbai playing with 5 international players lost to Jammu and Kashmir team)

दुसऱ्या डावात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने शतक झळकावले. त्याने 119 धावांची खेळी शानदार खेळी खेळली. तर तनुश कोटियनने 62 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांमुळे मुंबईने जम्मू-काश्मीरला 205 धावांचे लक्ष्य दिले. जम्मूच्या फलंदाजांनी लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक खेळी केली. सलामीवीर शुभम खजुरियाने 45 धावा केल्या. याशिवाय यावर हसनने 24, विव्रांत शर्माने 38, अब्दुल समदने 24 आणि कर्णधार पारस डोग्राने 15 धावा केल्या. तर आबिद मुश्ताक 32 आणि कन्हैया वाधवा 19 यांनी 46 धावा जोडून संघाला विजय मिळवून दिला.

आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी केली निराशा

दरम्यान, मुंबई संघात भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, कसोटी संघातील सलामीवीर यशस्वी जैस्वाल, याशिवाय मधल्या फळीत माजी कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबेसारखे खेळाडू असतानाही पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या डावात मुंबईचा संघ 120 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात जम्मू-काश्मीर संघ 206 धावा करत 86 धावांची आघाडी घेतली. यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूरच्या शतकामुळे 290 धावांपर्यंत मजल मारत 204 धावांची आघाडी घेतली. मात्र जम्मू आणि काश्मीरने 5 विकेट्स गमावत हा सामना सहज जिंकला.