घरक्रीडापश्चिम विभाग खो-खो स्पर्धेचे मुंबई विद्यापीठाला जेतेपद

पश्चिम विभाग खो-खो स्पर्धेचे मुंबई विद्यापीठाला जेतेपद

Subscribe

वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेज क्रीडांगणावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा (बीएएम) विद्यापीठ, औरंगाबादचा पराभव केला.

मुंबई विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचा पराभव करत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ मुलांच्या खो-खो स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने एस. पी. पुणे विद्यापीठाचा पराभव केला.

कर्णधार अनिकेत पोटेची चमकदार कामगिरी

वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेज क्रीडांगणावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा (बीएएम) विद्यापीठ, औरंगाबादचा १८-१७ असा ४० सेकंद राखून पराभव केला. या सामन्यात बीएएमने चांगली सुरुवात करत मध्यंतराला ११-९ अशी आघाडी मिळवली. पण मध्यंतरानंतर कर्णधार अनिकेत पोटे (०:१०, १ मि. संरक्षण आणि ३ गडी बाद), निखिल वाघे (०:२०, १ मि. संरक्षण आणि ४ गडी), सागर घाग (१:३०, १:५० मि. संरक्षण आणि ३ गडी), संकेत कदम (२:००, १:३० मि. संरक्षण आणि १ गडी) यांच्या दमदार खेळामुळे मुंबई विद्यापीठाने बीएएमची आघाडी कमी केली. अखेर त्यांनी हा सामना १८-१७ असा जिंकत स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

शिवाजी विद्यापीठाला तिसरा क्रमांक  

तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने एस. पी. पुणे विद्यापीठावर १७-१६ अशी मात केली. या सामन्यात शिवाजी विद्यापीठाकडून निलेश जाधव (२:२०, १:३० मि. संरक्षण) आणि अभिनंदन पाटील (०:२०, १:१० मि. संरक्षण आणि ४ गडी) यांनी चमकदार कामगिरी केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -