रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्फराज खानची तुफानी खेळी; पाच इनिंगमध्ये केल्या ७०४ धावा

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये (ranji trophy quarter final) सर्फराज खान (sarfaraz khan) तुफान फलंदाजी करत आहे. मुंबई (Mumbai) विरूद्ध उत्तराखंड (uttarakhand) यांच्यातील सामन्यात सर्फराज खान याने १४० चेंडूत शतकी खेळी केली.

Sarfaraz

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये (ranji trophy quarter final) सर्फराज खान (sarfaraz khan) तुफान फलंदाजी करत आहे. मुंबई (Mumbai) विरूद्ध उत्तराखंड (uttarakhand) यांच्यातील सामन्यात सर्फराज खान याने १४० चेंडूत शतकी खेळी केली. क्वार्टर फायनलच्या दुसऱ्याच दिवशी सर्फराजने शतक ठोकले. सर्फराजच्या या तुफान खेळीची क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगली असून, अनेक अनुभवी क्रिकेटपटूही त्यांच्या शतकी खेळीची चर्चा करत आहेत. (mumbai vs uttrakhand ranji trophy quarter final sarfaraz khan hits another century)

मुंबईकर सर्फराज खानचा या सिझनमधील हे तिसरे शतक आहे. तसेच, या सिझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील त्याने केला आहे. सर्फराजने पाच इनिंगमध्ये १४०.८० च्या सरासरीने ७०४ धावा केल्या आहेत. सर्फराज गेल्या दोन वर्षांपासून फॉर्ममध्ये आहे. मागील १३ इनिंगमध्ये एक त्रिशतक, दोन द्विशतक आणि दोन शतक झळकावले आहे. या सिझनमध्ये त्याचा स्ट्राईक रेट देखील ७० पेक्षा जास्त आहे.

हेही वाचा – Ranji Trophy: सॅल्यूट! मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर रणजीमध्ये झळकावलं शानदार शतक, खेळाडूंसमोर ठेवला आदर्श

या सामन्यामध्ये मुंबईचा कॅप्टन पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) नाणेफेक जिंकून प्रथन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंजादी करताना सर्फराजने २०५ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकार मारत १५३ धावा केल्या. त्यानंतर तो बाद झाला. या खेळीत त्याने ११ चैकार आणि २ षटकार मारत शतक पूर्ण केले.

कर्णधार पृथ्वी शॉ २१ धावा काढून आऊट झाला. यशस्वी जयस्वालही ३५ रन काढून परतला. अरमान जाफरने अर्धशतकी खेळी करत ६० धावांची खेळी केली. त्यानंतर सुवेद पारकर आणि सर्फराज खान या जोडीनं उत्तराखंडला पूर्णपणे बॅकफुटवर ढकललं. नवोदीत सुवेदनंही यावेळी शतक झळकावलं. सर्फराज आणि सुवेदच्या शतकामुळे मुंबईनं ४५० धावांचा टप्पा गाठला.


हेही वाचा – बँक ऑफ महाराष्ट्रमधील घोटाळ्याप्रकरणी ‘या’ भारतीय क्रिकेटपटूचे पिता तुरुंगात