घरक्रीडामुंबईने आमच्यापेक्षा एक चूक कमी केल्याने सामना जिंकला

मुंबईने आमच्यापेक्षा एक चूक कमी केल्याने सामना जिंकला

Subscribe

महेंद्रसिंग धोनी

मुंबई इंडियन्सने अवघ्या एका धावणे चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत आयपीएल स्पर्धा जिंकली असली, शेवटपर्यंत हा सामना कोण जिंकणार हे कळत नव्हते. या सामन्यादरम्यान दोन्ही संघ जणू एकमेकांना आयपीएल करंडक देत होते, असे सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले. या सामन्याच्या मधल्या काही षटकांत शेन वॉटसनच्या चांगल्या फलंदाजीमुळे चेन्नईचे पारडे जड वाटत होते, पण जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा यांनी अप्रतिम गोलंदाजी करत मुंबईला हा सामना जिंकवून दिला.

आम्ही या सामन्यात अजून चांगला खेळ करणे गरजेचे होते. हा सामना खूपच रंगतदार झाला. दोन्ही संघ जणू एकमेकांना आयपीएल करंडक देत होते. दोन्ही संघांनी खूप चुका केल्या आणि अखेर ज्या संघाने एक चूक कमी केली, तो संघ जिंकला. हा सामना जिंकता आला नसला, तरी आम्ही संघ म्हणून या मोसमात खूप चांगली कामगिरी केली. मात्र, आता आम्ही काय चुका केल्या, याबाबत विचार करण्याची गरज आहे. आमच्या मधल्या फळीतील फलंदाजांना चांगले प्रदर्शन करता आले नाही, पण तरीही आम्ही सामना जिंकत राहिलो. आमच्या गोलंदाजांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. अंतिम सामन्यातही या खेळपट्टीवर १५० हून अधिक धावा होऊ शकल्या असत्या, पण आमचे गोलंदाज ठराविक अंतराने विकेट मिळवत राहिले. फलंदाजीत एखादा खेळाडू चांगला खेळून आम्हाला सामना जिंकवून देत राहिला. त्यामुळे पुढील वर्षी आम्हाला सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्हाला खूप विचार करावा लागणार आहे. मात्र, आता मी विश्वचषकावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यानंतर आपण चेन्नईबाबत अजून बोलू, असे धोनी म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -