घरक्रीडाIND vs AUS : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेचे मुंबईत जंगी स्वागत!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेचे मुंबईत जंगी स्वागत!

Subscribe

भारताचे खेळाडू गुरुवारी सकाळी मायदेशी परतले.

मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारताने चार सामन्यांची ही मालिका २-१ अशी जिंकत बॉर्डर-गावस्कर करंडक सलग तिसऱ्यांदा आपल्याकडे राखला. या कसोटी मालिकेतील चौथा सामना गॅबा येथे झाला. गॅबाच्या मैदानावर यजमान ऑस्ट्रेलियाला ३२ वर्षांत कोणताही संघ पराभूत करू शकला नव्हता. मात्र, रहाणेच्या भारताने गॅबावरील ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व मोडीत काढले आणि तीन विकेट राखून सामना जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर भारताचे खेळाडू गुरुवारी सकाळी मायदेशी परतले. अजिंक्य रहाणे मुंबईत परतल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.

मुंबईच्या रूपारेल कॉलेजच्या शेजारी असणाऱ्या इमारतीत अजिंक्य राहण्यास आहे. या इमारतीत अजिंक्यसाठी जमिनीवर रेड कार्पेट घालून ठेवण्यात आले होते. ढोल ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. ‘आला रे आला, अजिंक्य आला’ अशा घोषणाही या इमारतीतील रहिवास्यांनी दिल्या. अजिंक्यने त्याची दोन वर्षीय मुलगी आर्याला कडेवर घेत जंगी स्वागताचा स्वीकार केला. यावेळी त्याच्यासोबत पत्नीदेखील होती.

- Advertisement -

हेही वाचा – रहाणेच्या ऐतिहासिक यशानंतर कर्णधार कोहलीवर दडपण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -