घरक्रीडाधोनी ट्रोलर्सना मुरली कार्तिकचे खडे बोल

धोनी ट्रोलर्सना मुरली कार्तिकचे खडे बोल

Subscribe

धोनीने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्याच्या सामन्यात स्वत:च्या १०००० धावा पूर्ण केल्या. मात्र संघासाठी काही करू शकला नाही, म्हणून झाला होता ट्रोल.

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंग धोनीने आपल्या १०००० धावा पूर्ण केल्या. त्याने आपला ३२० वा सामना खेळला. मात्र संघाला तो जिंकवू शकला नाही, त्यामुळे मैदानावर आणि नंतर सोशल मीडियावर धोनी बराच ट्रोल झाला, त्याच्या या ट्रोलर्सना त्याचा जुना सहकारी, मुरली कार्तिकने चांगलाच रिप्लाय दिला आहे.

नक्की काय आहे कार्तिकचा रिप्लाय

धोनीचा जुना सहकारी मुरली कार्तिकने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर लिहिले आहेकी, “धोनी सहाव्या स्थानावर बॅटिंगला येतो आणि तरी त्याने इतक्या धावा केल्या आहेत, याचा अर्थ आमचे सलामीचे बॅट्समन चांगले नाहीत असा नाही. परंतु महान व्यक्तीने स्वत:साठी किंवा चाहत्यांसाठी काय केले किंवा केले नाही यापेक्षा त्याने संघासाठी काय केले हे महत्वाचे असते आणि धोनीने हे वेळोवेळी दाखवून दिले आहे.”

- Advertisement -

धोनी ठरला पाचवा बॅट्समन

धोनीने १०००० धावा करणाऱ्या ११ बॅट्समनच्या या यादीत जागा मिळवली आहे. त्याने २७३ सामन्यात ही कामगिरी केली असून सर्वात जलद गतीने १०००० धावा करणारा तो ५वा बॅट्समन ठरला आहे. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरन २५९ , सौरव गांगुलीने २६३, रिकी पॉटिंगने २६६ तर जॅक कॅलिसने २७२ सामन्यात ही कामगिरी केली आहे. धोनीने सध्या एकदिवसीय सामन्यात १०००४ धावा आपल्या नावे केल्या असून, त्याने ५१.३० च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. यात १० शतकांचा आणि ६७ अर्धशतकांचा समावेश आहे.

- Advertisement -
Dhoni
महेंद्रसिंग धोनी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -