भर सामन्यात प्रेक्षकाची मुरली विजयसोबत थट्टा, स्टँडमध्ये घुसून विजयने दिला रट्टा, व्हिडीओ व्हायरल

तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये क्रिकेटपटू मुरली विजयला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सामना सुरू असताना एका प्रेक्षकाने मुरली विजयची थट्टा केली. मात्र, प्रेक्षकाने केलेली ही चेष्टा त्याला महागात पडली आहे. कारण संतापलेल्या मुरली विजयने स्टँडमध्ये घुसून त्याला चांगलाचं रट्टा दिला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मैदानाच्या सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना दिनेश कार्तिकच्या नावाने हाका मारून त्याला चिडवण्यात आले. असाच प्रकार २४ जुलैच्या सामन्यातही घडला होता. मात्र, संतापलेल्या मुरली विजयने मैदान सोडून स्टँडमध्ये धाव घेत प्रेक्षकाशी वाद घालत हाणामारी केली. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मदुराई पँथर्स आणि त्रिची वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान हा प्रकार घडला आहे. या सामन्यात मदुराई पँथर्सने ३६ धावांनी त्रिची वॉरियर्स या संघाला पराभूत केले. मात्र, हा सामना मुरली विजयमुळे चर्चेत राहिला. या सामन्यात मुरली विजयचा समावेश नव्हता. कारण तो काही वेळासाठी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवासांपासून अनेक प्रेक्षक हे मुरली विजयला दिनेश कार्तिकच्या नावाने चिडवत आहेत. खासगी आयुष्याबाबत मारण्यात येत असलेल्या टोमण्यांमुळे मुरली विजयला राग आला. त्यामुळे तो संतापून प्रेक्षकांजवळ गेला. मात्र, या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.


हेही वाचा : भारताला मोठा धक्का, राष्ट्रकुल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची