घरक्रीडामहाराष्ट्राला नमवत कर्नाटक अजिंक्य

महाराष्ट्राला नमवत कर्नाटक अजिंक्य

Subscribe

मयांक अगरवाल आणि रोहन कदमच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर कर्नाटकने सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा ८ विकेट राखून पराभव करत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ही टी-२० स्पर्धा जिंकण्याची कर्नाटकची ही पहिलीच वेळ आहे.

या सामन्यात कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार राहुल त्रिपाठी यांनी पहिल्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. पुढे मात्र गायकवाड (१२), विजय झोल (८) आणि त्रिपाठी (३०) झटपट बाद झाल्याने महाराष्ट्राची ३ बाद ५५ अशी अवस्था होती. यानंतर अंकित बावणे आणि नौशाद शेख यांनी चांगली फलंदाजी करत महाराष्ट्राचा डाव सावरला. या दोघांनी ८१ धावांची भागीदारी केली. २९ धावा केल्यानंतर बावणे बाद झाला. नौशाद शेखने मात्र अप्रतिम फलंदाजी करत ४१ चेंडूंत ६९ धावांची खेळी केली. त्यामुळे महाराष्ट्राने आपल्या २० षटकांत ४ विकेट गमावत १५५ धावा केल्या.

- Advertisement -

१५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचा सलामीवीर शरथ २ धावांवर माघारी परतला, पण यानंतर रोहन कदम आणि मयांक अगरवाल यांनी खूपच चांगली फलंदाजी केली. त्यांनी दुसर्‍या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. कदम ३९ चेंडूंत ६० धावा करून बाद झाला, पण अगरवालने ५७ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८५ धावा करत कर्नाटकला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक –

- Advertisement -

महाराष्ट्र : २० षटकांत ४ बाद १५५ (नौशाद शेख ६९, राहुल त्रिपाठी ३०, अंकित बावणे २९; अभिमन्यू मिथुन २/२४) पराभूत वि. कर्नाटक : १८.३ षटकांत २ बाद १५९ (मयांक अगरवाल नाबाद ८५, रोहन कदम ६०; दिव्यांग हिंगणेकर १/२१).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -