घरक्रीडानदाल उपांत्यपूर्व फेरीत

नदाल उपांत्यपूर्व फेरीत

Subscribe

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस

स्पेनचा महान टेनिसपटू आणि अव्वल सीडेड राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने पुरुष एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या रंगतदार सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसचा ६-३, ३-६, ७-६, ७-६ असा पराभव केला. स्वित्झर्लंडच्या स्टॅनिस्लास वॉवरिंकाने चौथ्या सीडेड डॅनिल मेदवेदेव्हला ६-२, २-६, ४-६, ७-६, ६-२ असे पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली. तसेच सातव्या सीडेड अलेक्झांडर झ्वेरेव आणि पाचव्या सीडेड डॉमिनिक थीम यांनाही उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले.

किरियॉसला घरच्या प्रेक्षकांचा खूप पाठिंबा मिळत असल्याने तो उप-उपांत्यपूर्व फेरीत नदालला चांगली झुंज देईल अशी अपेक्षा होती आणि तसेच झाले. नदालने पहिला सेट जिंकल्यानंतर किरियॉसने दमदार पुनरागमन करत दुसरा सेट जिंकला. तिसर्‍या आणि चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला. त्यामुळे हे सेट टाय-ब्रेकरमध्ये गेले. मात्र, १९ वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या नदालने आपला अनुभव पणाला लावत हे सेट ७-६ (६), ७-६ (४) असे जिंकत सामनाही जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याचा थीमशी सामना होईल.

- Advertisement -

किकी बेर्टेन्स पराभूत

हॉलंडच्या नवव्या सीडेड किकी बेर्टेन्सला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिलांच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला स्पेनची अनुभवी खेळाडू गॅब्रिना मुगुरुझाने ६-३, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. रशियाच्या ३० व्या सीडेड अनास्तासिया पावलूचेंकोव्हाने जर्मनीच्या अँजेलिक कर्बरवर ६-७, ७-६, ६-२ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -