घरक्रीडा‘नागेश करंडक’ अंध क्रिकेट सामने पुण्यात संपन्न

‘नागेश करंडक’ अंध क्रिकेट सामने पुण्यात संपन्न

Subscribe

तामिळनाडू, झारखंड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या संघांनी सहभाग घेतला

नागेश करंडक जे अंध क्रिकेटचे रणजी सामने ११ व १२ नोव्हेंबर २०१९ रोजी अनुक्रमे पुण्यातील डेक्कन जिमखाना आणि पीवायसी मैदान येथे २० षटकांचे ५ सामने खेळविण्यात आले. तामिळनाडू, झारखंड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या संघांनी सहभाग घेतला. पहिल्या दिवसामध्ये ३ सामने आणि दुसर्‍या दिवशी २ सामने या प्रमाणे या सामन्यांची मालिका होती. उद्घाटन सोहळा पीवायसी मैदानावर स्वच्छ नदी प्रकल्प फाउंडेशन संस्थापक पराग माती सोबत फाउंडेशनच्या स्वयंसेवक मिस कॅरेलिन (कॅनडा) आणि मिस जेड (ऑस्ट्रेलिया) यांच्याबरोबर क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्रचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

पहिला सामना पीवायसी मैदानावर महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू दरम्यान झाला. नाणेफेक जिंकत तमिळनाडूने संघाने शेत्ररक्षण निवडले. महाराष्ट्राने चार विकेट गमावून २० षटकात १९५ धावा केल्या. तामिळनाडूला हे लक्ष गाठता आले नाही. दुसरा सामना झारखंड विरुद्ध पश्चिम बंगाल दरम्यान डेक्कन जिमखाना येथे झाला. झारखंडने नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण निवडले. या सामन्यात पश्चिम बंगालने १३८ धावा केल्या. झारखंडने १६.२ षटकांत २ गडी गमावत हा सामना जिंकला.

- Advertisement -

तिसरा सामना महाराष्ट्र विरुद्ध झारखंड दरम्यान डेक्कन जिमखाना येथे झाला. झारखंडने नाणेफेक जिंकत शेत्ररक्षण निवडले. महाराष्ट्राने १६५ धावांचा डोंगर उभा केला. पण झारखंडला ३५ धावांनी हार मानवी लागली.

दुसर्‍या दिवशीच्या खेळात डेक्कन जिमखाना येथे झारखंड विरुद्ध तामिळनाडू असा चौथा सामना खेळला गेला. या सामन्यात झारखंडने नाणेफेक जिंकला आणि शेत्ररक्षण निवडले. तमिळनाडू संघाला ९९ धावांवर बाद करत झारखंडने सहजतेने धावांचा पाठलाग केला आणि ९ गडी राखत तो जिंकला. डेक्कन जिमखाना येथे महाराष्ट्र विरुद्ध पश्चिम बंगाल येथे पाचवा सामना खेळविण्यात आला. महाराष्ट्रने नाणेफेक जिंकत शेत्ररक्षण निवडले. पश्चिम बंगालने ५ गडी गमावून १६४ धावा केल्या. तर महाराष्ट्राने धावांचा पाठलाग करत सामना ६ गडी बाद सामना जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -