घरक्रीडाभारताच्या 'या' माजी यष्टिरक्षकाची निवृत्ती; घोषणा करताना अश्रू झाले अनावर  

भारताच्या ‘या’ माजी यष्टिरक्षकाची निवृत्ती; घोषणा करताना अश्रू झाले अनावर  

Subscribe

त्याने एकमेव कसोटी सामना २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला. 

महेंद्रसिंग धोनीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक प्रतिभावान यष्टीरक्षक-फलंदाजांना भारतीय संघामध्ये स्थान मिळवणे अवघड झाले होते. याच यष्टीरक्षक-फलंदाजांपैकी एक म्हणजे नमन ओझा. ओझाने सोमवारी आंतरराष्ट्रीय आणि भारतातील स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. परंतु, तो परदेशातील स्पर्धांमध्ये खेळत राहणार आहे. ३७ वर्षीय ओझाला भारताकडून खेळण्याची फारशी संधी मिळाली नसली, तरी स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळताना त्याने अप्रतिम कामगिरी केली. रणजी ट्रॉफीमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम ओझाच्या नावे आहे. ‘मी निवृत्तीची घोषणा करू इच्छितो,’ असे ओझा म्हणाला. निवृत्तीची घोषणा करताना ओझाला अश्रू अनावर झाले.

एकमेव कसोटी श्रीलंकेविरुद्ध 

‘मी निवृत्तीची घोषणा करू इच्छितो. देशासाठी व माझ्या राज्यासाठी क्रिकेट खेळण्याचे मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो याचा आनंद आहे,’ असे ओझा म्हणाला. ओझाने २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर त्याला झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. तसेच त्याने त्याचा एकमेव कसोटी सामना २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला.

- Advertisement -

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २२ शतके

ओझाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी छाप पाडता आली नाही. परंतु, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १४६ सामन्यांत ९७५३ धावा केल्या, ज्यात २२ शतकांचा समावेश होता. त्याने त्याचा अखेरचा रणजी सामना मागील वर्षी जानेवारीत खेळला होता. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली डेअरडेविल्स या संघांकडून खेळला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -