Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा T20 world cup 2021 : SCO vs NAM गोलंदाजांच्या जोरावर नामिबियाकडून स्कॉटलँडचा...

T20 world cup 2021 : SCO vs NAM गोलंदाजांच्या जोरावर नामिबियाकडून स्कॉटलँडचा पराभव

Subscribe

आयसीसी टी २० विश्वचषकातील बुधवारच्या २१ व्या सामन्यात नामिबियाने स्कॉटलँडवर ४ गडी राखून विजय मिळवला

आयसीसी टी २० विश्वचषकातील बुधवारच्या २१ व्या सामन्यात नामिबियाने स्कॉटलँडवर ४ गडी राखून विजय मिळवला. स्कॉटलँडने प्रथम फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला ११० धावांचे आव्हान दिले होते. स्कॉटलँडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग नामिबियाने ५ चेंडू आणि ४ गडी राखून पूर्ण केला. नामिबिया कडून जेजे स्मिटने सर्वाधिक ३२ धावांची नाबाद खेळी केली. तर त्याच्यापाठोपाठ वेन लिंगेनने १८ धावा केल्या तर लिंगेन संघाची धावसंख्या २८ असताना बाद झाला. सामन्यात पूर्णत: गोलंदाजांचे वर्चस्व पहायला मिळाले. स्कॉटलँड कडून माइकल लीस्कने सर्वाधिक २ बळी घेतले, तर नामिबिया कडून वेगवान गोलंदाज रूबेन ट्रम्पेलने सामन्याच्या पहिल्याच षटकात ३ बळी घेऊन स्कॉटलँडच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले.

प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलँडने २० षटकांत ८ बाद १०९ धावा उभारल्या. स्कॉटलँडकडून माइकल लीस्कने २७ चेंडूत सर्वाधिक ४४ धावा केल्या. दोन्ही संघाची गोलंदाजी प्रभावशील पहायला मिळाली, नामिबिया सोबतच स्कॉटलँडच्या गोलंदाजांनीही शानदार खेळी केली. पण ती खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. नामिबियाने आपल्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर स्कॉटलँडचे १०० धावांच्या अगोदरच ६ गडी माघारी पाठवले. १७ षटके पूर्ण स्कॉटलँडची धावसंख्या ६ बाद ९६ एवढी होती.

- Advertisement -

जेजे साफयानने शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारून सामना नामिबायाच्या नावावर केला. नामिबिया कडून गोलंदाजीत रूबेन ट्रंपलेनचे सर्वाधिक वर्चस्व पहायला मिळाले त्याने सामन्याच्या पहिल्याच षटकात स्कॉटलँडच्या ३ फलंदाजांना बाद करून सामन्यावर पकड मजबूत केली.

स्कॉटलँडचा संघ

काइल कोएत्झर (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस, रिची बेरिंग्टन, कॅलम मॅक्लिओड, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्ह्ज, मार्क वॉट, जोश डेव्ही, सफियान शरीफ, ब्रॅडली व्हील,

नामिबियाचा संघ

- Advertisement -

झेन ग्रीन, क्रेग विलिअम्स, माइकेल वॅन लिंजेन, गेर्हार्ड इरास्मस (कर्णधार), डेव्हिड वाइस, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, पिक्की या फ्रान्स, जॅन निकोल लॉफ्टी-इटन, रुबेन ट्रम्पेलमन, बर्नार्ड शॉल्झ,

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -