घरक्रीडाUS OPEN 2018 : सेरेनाला मात देत ओसाका ठरली विजेती

US OPEN 2018 : सेरेनाला मात देत ओसाका ठरली विजेती

Subscribe

या विजयासोबतच जपानची ओसाका ग्रँडस्लॅम जिंकणारी पहिली महिला जपानी खेळाडू ठरली आहे.

अमेरिकन ओपनमध्ये ६ वेळा विजय मिळवणाऱ्या सेरेना विलियम्सला अंतिम सामन्यात मात देत जपानच्या नाओमी ओसाकाने विजेतेपद मिळवले आहे. नाओमीने सेरेनाला ६-२, ६-४ अशा सेट्समध्ये पराभव करत आपला विजय नोंदविला आहे. विशेष म्हणजे ग्रँडस्लॅम सारखी मानाची स्पर्धा जिंकणारी नाओमी ओसाका ही पहिली महिला जपानी खेळाडू ठरली आहे. ओसाकाने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या मॅडिसन किज हिचा ६-२, ६-४ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

- Advertisement -

असा झाला सामना

२० वर्षीय नोओमीने सुरूवातीपासूनच सामन्यावर आपली पकड ठेवली होती. पहिल्या सेटमध्ये सुरूवातीलाच नाओमीने आघाडी घेतली आणि ६-२ च्या फरकाने सेट सहज आपल्या नावे केला. पहिल्या सेटमधील विजयाने नाओमीने सामन्यात १-० ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा सेटमध्ये सेरेनाने चांगली टक्कर दिली मात्र अखेर नाओमीने आपला खेळ उंचावत सेट ६-४ च्या फरकाने जिंकत सामन्यात विजय मिळवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -