घरक्रीडातनिशा कोटेचाचा गौरव

तनिशा कोटेचाचा गौरव

Subscribe

नासिक जिमखाना महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ

नाशिक जिमखाना आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते, तर संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, चिटणीस राधेश्याम मुंदडा, सहसचिव शेखर भंडारी, नितीन चौधरी, प्रकाश सिकची आदी पदाधिकार्यांच्या उपस्थितीत विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या खेळाडूंमध्ये तनिशा कोटेचा (टेबल टेनिस), अमेय खोंड (बॅडमिंटन), सायली वाणी (टेबल टेनिस), सौमित देशपांडे (टेबल टेनिस) आणि कुशल चोपडा(टेबल टेनिस) यांचा समावेश होता.

तसेच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिमख्यानाची पाहणी करुन खेळाडू आणि संस्थेला सर्वेतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे माजी अध्यक्ष व्ही. एच. पाटील आणि राज्य बॅडमिंटन संघटनेचे पधाधिकारी एस. राजन यांचा यावेळी अध्यक्ष छाजेड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मिलिंद जोशी, झुलकर जहागीरदार, अभिषेक छाजेड, राजेश भरवीरकर, मोहन सदावर्ते, अलीअसगर आदमजी, नारायण जाधव, मंगेश गंभीरे, चंदन जाधव, जयंत कर्पे, जय मोडक, अजिंक्य शिंत्रे, पुरुषोत्तम आहेर, अनंत जोशी, पराग एकांडे, अमित देशपांडे, संजय मराठे आदी मान्यवर, पालक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -