घरक्रीडाटी-20 विश्वचषकात महिला कॉमेंट्रेटरची पर्थ स्टेडियमच्या छतावर उलटे लटकून कॉमेंट्री

टी-20 विश्वचषकात महिला कॉमेंट्रेटरची पर्थ स्टेडियमच्या छतावर उलटे लटकून कॉमेंट्री

Subscribe

टी-20 विश्वचषकात आज पाकिस्तान आणि नेदरलॅंड्स यांच्यात सामना सुरू असताना एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या सामन्यात महिला कॉमेंटेटर नताली जर्मनस हिने पर्थ स्टेडियमच्या छताला उलटे लटकून कॉमेंट्री केल्याचे पाहायला मिळाले.

टी-20 विश्वचषकात आज पाकिस्तान आणि नेदरलॅंड्स यांच्यात सामना सुरू असताना एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या सामन्यात महिला कॉमेंटेटर नताली जर्मनस हिने पर्थ स्टेडियमच्या छताला उलटे लटकून कॉमेंट्री केल्याचे पाहायला मिळाले. नतालीच्या या कॉमेंट्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Natalie germanous commentary from roof of Perth stadium t20 world cup 2022)

पाकिस्तान आणि नेदरलॅंड्स यांच्यातील सामन्यावेळी पाकिस्तानचा संघ फलंदाजी करत असताना नताली कॉमेंट्री करत होती. यावेळी नताली पर्थ स्टेडियमच्या छतावर जाऊन कॉमेंट्री करत होती. या कॉमेंट्रीवेळी नतालीने स्वत:ला दोरीच्या सहाय्याने छताला उलटे टांगले होते. कॉमेंट्री करत असताना कॉमेंटेटर नताली कॅमेरामन आणि आणखी एक व्यक्ती छतावर दिसत आहे.

- Advertisement -

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने 20 षटकात 9 बाद केवळ 92 धावा केल्या. पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 4 षटकात 19 धावा देत 1 विकेट घेतली. मोहम्मद वसीम ज्युनियरने 3 षटकात 15 धावा देत 2 गडी बाद केले. शादाब खानने 4 षटकात 22 धावा देत 3 गडी बाद केले होते.

नेदरलॅडने दिलेल्या 92 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा सलामीवीर आणि कर्णधार बाबर आझम याला चांगली सुरूवात करता आली नाही. बाबर आझम 5 चेंडूत 4 धावा करत धावबाद झाला. पण मोहम्मद रिझवानने 49 धावांची खेळी करुन सामना जिंकवून दिला. या विजयासह पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत 2 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तसेच, नेदरलँडचा संघ 6व्या स्थानावर आहे. नेदरलँडला आतापर्यंत आपले खाते उघडता आलेले नाही.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs SA : अश्विनने मिलरला बाद केले नाही अन् भारताच्या विजयाची संधी हुकली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -