घरक्रीडाIND vs AUS : नेथन लायनपासून टीम इंडियाला धोका - रिकी पॉन्टिंग

IND vs AUS : नेथन लायनपासून टीम इंडियाला धोका – रिकी पॉन्टिंग

Subscribe

लायनने सध्या सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पुजाराची महत्वाची विकेट घेतली होती.

भारतीय संघाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑफस्पिनर नेथन लायनपासून धोका असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत लायन तिसऱ्या स्थानावर असून त्याने आतापर्यंत ९७ सामन्यांत ३९१ विकेट घेतल्या आहेत. लायनने सध्या सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराची महत्वाची विकेट घेतली होती. तो पुढील सामन्यांतही भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकू शकेल, असे पॉन्टिंगला वाटते.

भारताविरुद्ध लायनने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्याने विराट कोहलीला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद केले आहे. त्याने पहिल्या डावात पुजाराला बरेच अडचणीत टाकले होते. त्याच्यापासून भारतीय फलंदाजांना धोका आहे. त्याच्या चेंडूला अधिक स्पिन मिळतो. क्षेत्ररक्षक जेव्हा फलंदाजाच्या जवळ उभे असतात, तेव्हा लायनला विकेट मिळण्याची सर्वाधिक संधी असते. तो फारसे खराब चेंडू टाकत नाही आणि फलंदाजांवर दबाव बनवून ठेवतो, असे पॉन्टिंग म्हणाला. कसोटी क्रिकेटमध्ये लायनने आतापर्यंत १९ सामन्यांच्या ३५ डावांमध्ये १०९ विकेट घेतल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -