national wrestling championship: राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत फोगाट भगिणींची कमाल, संगीताला गोल्ड तर गीताला सिल्वर मेडल

national wrestling championship sangeeta phogat won gold and geeta phogat won silver medal
national wrestling championship: राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत फोगाट भगिणींची कमाल, संगीताला गोल्ड तर गीताला सिल्वर मेडल

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत फोगाट भगिनींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन केलेल्या गीता फोगाटने सिल्वर पदकावर नाव कोरलं आहे. तर संगीता फोगाटने गोल्ड पदक जिंकले आहे. सरिता मोरने शुक्रवारी आपले कसब दाखवत गीता फोगाटला ५९ किलोच्या अंतिम फेरीत पराभूत केलं. तर दिव्या काकरान आणि साक्षी मलिकसारख्या कुस्तीपटूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. महिला गटात ५९ किलोचा वर्ग आव्हानात्मक होता कारण या गटात जागतिक स्पर्धेत तीनवेळा विजेतेपद पटकवणारी कुस्तीपटू सामील होती.

जागतिक स्पर्धेतील ब्रॉन्ज मेडल विजेती सरिता मोरला पूजा ढांडाचा सामना करावा लागला होता. केवळ दोन राऊंडमध्येच तिने आपल्या प्रतिस्पर्धीला चितपट करत अंकांच्या जोरावर स्पर्धा जिंकली. गीता फोगाटने तीन वर्ष कुस्तीपासून दूर राहिल्यानंतर पुनरागमन केलं. विश्व चॅम्पियनशिप २०१२ची कांस्य पदक विजेती ३२ वर्षीय गीताने अंतिम फेरीत प्रवेश केला परंतु सरिताने ८-० अशा फरकाने गीताला पराभूत केलं.

गीताने २०१७ मध्ये दिली होती सरिताला मात

गीता फोगाटने पहिल्यांदा आणि शेवटचे २०१७ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यावेळी अंतिम सामन्यात गीताने सरिताचा पराभव केला होता. सरिता नंतर म्हणाली होती की, जागतिक स्पर्धेनंतर माझा आत्मविश्वास वाढला होता. त्यानुसार माझ्या आक्रमकतेवर काम केले आणि मला आता आनंद होत आहे की, ज्यावर मी मेहनत केली त्याचा मला फायदा झाला. तर गीता फोगाट म्हणाली की, अंतिम सामन्यात ८-० फरक निराशजनक आहे, परंतु सिल्वर पदकाचा आनंद आहे. हार पराभव होत असतो. परंतु ज्या प्रकारे खेळाची रणनिती आखली होती त्यानुसार खेळता आले नाही. सरिताला मी आक्रमक होण्याची संधी दिली असल्यामुळे पराभव झाला असल्याचे गीताने म्हटलं आहे.

संगीता फोगाटजने जिंकले गोल्ड

संगीताला आपल्या पहिल्या सामन्यात पंजाबच्या लवलीना कौरने चांगले आव्हान दिले होते. संगीताने ६३ किलो वजनी गटात गोल्ड पदक जिंकले आहे. या वर्गात मनीषा ने साक्षी मलिकला ६-१ अशा फरकाने हरवले आहे.


हेही वाचा : कोहलीचे कर्णधारपद, रवी शास्त्रींचा मोठा खुलासा, व्हाईट – रेड बॉलचे कर्णधारपद…