Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Naveen-Ul-Haq Vs Virat Kohli: IPL 2023 मधून RCB बाहेर पडताच, उल हकने...

Naveen-Ul-Haq Vs Virat Kohli: IPL 2023 मधून RCB बाहेर पडताच, उल हकने विराटला डिवचलं

Subscribe

नवीन-उल-हकने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये एक माणूस मोठ्याने हसत आहे. लोकांनी पटकन त्याचं हसणं आरसीबीच्या पराभवाशी जोडलं

नवीन-उल-हकने न सुधारण्याचं ठरवल्याचं दिसून येत आहे, म्हणूनच आयपीएल 2023 मधून आरसीबी बाहेर पडल्यानंतर त्याने असे काही केले की कोणालाही त्याचा खूप राग येईल. त्यातूनच विराट कोहलीचे फॅन्स तर तुम्हाला माहिती आहेत. ( Naveen-Ul-Haq Vs Virat Kohli As RCB crash out of IPL 2023 Ul Haq takes a dig at Virat )

लखनऊ सुपर जायन्टस् LSG नवीन-उल-हक आणि आरसीबीचा विराट कोहली यांच्यातील संघर्ष 1 मे रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यापासून सुरू झाला. 21 मे रोजी 20 दिवसांनंतरही हे दोन खेळाडू समोरासमोर नव्हते. तरीही नवीनने आरसीबीवर निशाणा साधला, कारण हा RCB प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे ही संधी साधत त्याने विराटवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

RCB प्लेऑफमधून बाहेर पडताच नवीन-उल-हकने काय केले, ते आता जाणून घेऊया. त्याने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये एक माणूस मोठ्याने हसत आहे. लोकांनी पटकन त्याचे हसणे आरसीबीच्या पराभवाशी जोडले, जे देखील अपरिहार्य होते कारण नवीनने ते आरसीबीच्या पराभवानंतर शेअर केले.

नवीनने त्याच संदर्भात ती इन्स्टा स्टोरी शेअर केली असावी असा अंदाज आहे. पण, त्यामागील वास्तव काय आहे हे तोच सांगू शकतील.

- Advertisement -

( हेही वाचा: IPL Playoffs : RCBच्या चाहत्यांच्या पदरी पुन्हा निराशा; मुंबईची प्लेऑफमध्ये एंट्री )

विराटची वादळी खेळी व्यर्थ

RCB Vs GT या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजी दिली. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 197 धावा केल्या. विराट कोहली वगळता इतर कोणत्याही फलंदाजाने आरसीबीकडून विशेष काही केले नाही.

विराट कोहलीने सामन्यात शतक झळकावले, जे या IPLच्या हंगामातील त्याच्या बॅटमधून दुसरे बॅक टू बॅक शतक होते. यासह विराट कोहलीच्या आयपीएलमधील एकूण शतकांची संख्या आता 7 झाली आहे, तर टी-20 क्रिकेटमध्ये ती 8 आहे. तो भारतीय फलंदाजांमध्ये T20 मध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा फलंदाज आहे.

आरसीबी हा संघ केवळ हरला नाही तर प्लेऑफमधून बाहेर पडला. गुजरात टायटन्स आरसीबीच्या १९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांनी ४ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. गुजरातकडून शुभमन गिलनेही शतक झळकावले. गुजरातने 6 विकेट्सने विजय मिळवताच आरसीबीचा पराभव तर झालाच पण प्लेऑफचे तिकीटही गमवावे लागले. मग काय, याच संधीचा फायदा घेत नवीन-उल-हकने एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली.

- Advertisment -