घरक्रीडाKhel Ratna Award 2021: नीरज चोप्रासह १२ खेळाडूंना मिळणार मेजर ध्यानचंद खेलरत्न...

Khel Ratna Award 2021: नीरज चोप्रासह १२ खेळाडूंना मिळणार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

Subscribe

येत्या १३ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. यादरम्यान टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचणारा नीरज चोप्रासह १२ खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. नीरज व्यतिरिक्त ऑलम्पिक स्पर्धेत देशाचे नाव लौकिक करणारे बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन, कुस्तीपटू रवि कुमार आणि हॉकी संघाचा खेळाडू श्रीजेश पीआर यांनाही या पुरस्कार सन्मानित केले जाईल. या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करत जगात देशाचे नाव उंचावले आहे.

याशिवाय महिला कसोटी क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजसह फुटबॉलपटू सुनील छेत्री यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराने गौरविण्यात येणारा पहिला फुटबॉलपटू छेत्री आहे. काही दिवसांपूर्वी गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा कुस्तीपटू रवी कुमारसह क्रिडा जगतातील १२ खेळाडूंना खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन केले होते.

- Advertisement -

भारताने यावर्षीच्या ऑलिम्पिकसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी खेळाडूंची टीम पाठवली होती. या स्पर्धेत १२१ खेळाडूंनी भारताकडून आव्हान दिले होते. देशात यावर्षी ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह सात पदके जिंकली. या ऑलिम्पिक स्पर्धेत विजेत्यांपैकी कुस्तीपटू बजरंग पुनिया, बॅडमिंटनपटून पीव्ही सिंधू आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे.


हेही वाचा – विराटनंतर रोहित नसून ‘हा’ खेळाडू होणार भारताचा कर्णधार; BCCI घेणार लवकरच निर्णय

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -