Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Neeraj Chopra ने इतिहास रचला, World Athletics चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला...

Neeraj Chopra ने इतिहास रचला, World Athletics चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय

Subscribe

Neeraj Chopra : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने (Neeraj Chopra) बुडापेस्ट येथे इतिहास रचला आहे. हंगेरीची राजधानी येथे सुरू असलेल्या World Athletics चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी World Athletics चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या कोणत्याही खेळाडूला सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. नीरज चोप्राने बुडापेस्ट येथील World Athletics चॅम्पियनशिपमध्ये 88.17 मीटरपर्यंत भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आहे. (Neeraj Chopra made history becoming the first Indian to win a gold medal in the World Athletics Championships)

6 राऊंडच्या अंतिम फेरीत नीरजने पहिल्या फेरीत फाऊल केला होता, मात्र दुसऱ्या फेरीतच त्याने जास्तीत जास्त अंतरापर्यंत भाला फेकून देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. नीरज चोप्राने उर्वरित 4 फेऱ्यांपर्यंत आघाडी कायम राखली. दुसऱ्या फेरीत नीरजने 88.17 मीटर, तिसऱ्या फेरीत 86.32 मीटर, चौथ्या फेरीत 84.64 मीटर, पाचव्या फेरीत 87.73 मीटर आणि सहाव्या फेरीनंतर पहिल्या फेरीत 83.98 मीटर भालाफेक केला.

- Advertisement -

नीरजचा मुख्य प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला, त्यामुळे त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी झेक प्रजासत्ताकच्या जेकब वेडलेचने 86.67 मीटरपर्यंत भालाफेक करून कांस्यपदकावर आपले नाव कोरले. आणखी दोन भारतीय खेळाडू किशोर जेनाने 84.77 मीटर आणि डीपी मनूने अंतिम फेरीत 84.14 मीटर भालाफेक केला. जेना पाचव्या आणि मनू यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नीरज चोप्राने यापूर्वी ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याने कारकिर्दीत प्रथमच World Athletics चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -