Neeraj Chopra Fitness : नीरज चोप्रा पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये, शेअर केला वर्कआऊटचा व्हिडिओ

टोक्यो ऑलम्पिक २०२० मधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. नीरजने वर्कआऊट आणि जिमचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नीरज एक्सरसाईज करताना दिसत आहे. तसेच व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलंय की, प्रयत्न आणि मेहनतीशिवाय कोणताही पर्याय नाही. नीरज चोप्रा जिममध्ये खूप मेहनत आणि वर्कआऊट करताना दिसत आहे.

नीरज चोप्रा बॅटल रोपसोबत एक्सरसाईज करत आहे. चोप्रा यावेळी अमेरिकेमध्ये आहे. तिथेच त्याने ट्रेनिंगला सुरूवात केली आहे. पॅरिस ऑलम्पिक सुद्धा २०२४ मध्ये होणार आहे. त्यामुळे नीरज चोप्रा या मिशनसाठी आता तयार होत आहे. काही क्षणापूर्वीच त्याने आपल्या प्रशिक्षकांसोबतचा व्हिडिओ शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neeraj Chopra (@neeraj____chopra)

टोक्योहून परतल्यानंतर नीरजने स्वत:ला थोडा वेळ दिला आहे आणि १२ किलो वजन त्याने वाढवलं. परंतु आता तो पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसत असून त्याचं रूटीन सुरू झालं आहे. दरम्यान, नीरज एक्सरसाईज करतानाचा व्हिडिओ प्रचंड वेगाने शेअर होत असून इंन्स्टाग्रामवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.


हेही वाचा : चौथी ॲशेस कसोटी अनिर्णित; ऑस्ट्रेलियाची व्हाईटवॉशची संधी हुकली