घर क्रीडा Neeraj Chopra: तिरंग्याच्या सन्मानार्थ नीरजने फेटाळली विदेशी चाहतीची मागणी; वाचा नेमकं...

Neeraj Chopra: तिरंग्याच्या सन्मानार्थ नीरजने फेटाळली विदेशी चाहतीची मागणी; वाचा नेमकं घडलं काय?

Subscribe

हरियाणामधील पानिपतचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले, मात्र हे विजेतेपद पटकावल्यानंतर नीरज चोप्राने तिरंग्यावर ऑटोग्राफ न देता लाखो भारतीय चाहत्यांची मने जिंकली. स्पर्धेनंतर एक महिला चाहती भारतीय ध्वजावर ऑटोग्राफ घेण्यासाठी आली होती, मात्र नीरजने तिला तिरंग्यावर ऑटोग्राफ देण्यास नकार दिला. ट्विटरवर एका यूजरने याबाबत ट्विटही केले आहे.

हरियाणामधील पानिपतचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले, मात्र हे विजेतेपद पटकावल्यानंतर नीरज चोप्राने तिरंग्यावर ऑटोग्राफ न देता लाखो भारतीय चाहत्यांची मने जिंकली.

स्पर्धेनंतर एक महिला चाहती भारतीय ध्वजावर ऑटोग्राफ घेण्यासाठी आली होती, मात्र नीरजने तिला तिरंग्यावर ऑटोग्राफ देण्यास नकार दिला. ट्विटरवर एका यूजरने याबाबत ट्विटही केले आहे. त्याने ट्विट केले की, ‘एक अतिशय सुंदर हंगेरियन महिला जिला खूप चांगले हिंदी बोलता येत होत, तिला नीरज चोप्राचा ऑटोग्राफ हवा होता. नीरजने पण तयारी दाखवली, पण नंतर लक्षात आले की तिला ऑटोग्राफ भारतीय ध्वजावर हवा आहे. नीरज त्या चाहतीला अतिशय नम्रपणे म्हणाला, ध्वजावर सही करू शकत नाही. शेवटी नीरजने त्या चाहतीच्या शर्टवर ऑटोग्राफ दिला. (Neeraj Chopra refuses to giver autograph on Tiranga Flag signed fan T Shirt instead )

- Advertisement -

याशिवाय नीरजने पाकिस्तानचा अॅथलीट अर्शद नदीमसोबत फोटो काढल्यानेही त्याची बरीच चर्चा झाली. नीरज फोटो काढत असताना त्याची नजर अर्शदवर गेली आणि नीरजने त्याला फोटो क्लिक करण्यासाठी बोलावले.

घरात उत्सवाचे वातावरण

तर दुसरीकडे नीरज चोप्राच्या विजयामुळे त्यांच्या गावात जल्लोषाचे वातावरण आहे. 88.17 मीटर भालाफेकमध्ये तो जगज्जेता ठरला तेव्हा त्याच्या खांद्रा गावात लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला. रात्री उशिरा संपूर्ण गाव आनंद व्यक्त करत होता.

- Advertisement -

लाइव्ह मॅच पाहण्यासाठी लोक नीरज चोप्राच्या घरी पोहोचले होते. सुवर्णपदक जिंकल्यावर लोकांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. नीरजचे काका भीम चोप्रा आणि वडील सतीश चोप्रा यांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या. निज्जू (नीरज चोप्रा) सोन्याप्रमाणे देशाच्या अपेक्षांवर खरा उतरल्याचे दोघांनीही एका स्वरात सांगितले. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे.

पाकिस्तानी खेळाडूनेही केलं अभिनंदन

जागतिक क्रमवारीतही त्याचे स्थान अव्वल स्थानावर राहील. गेल्या ३ महिन्यांपासून नीरज चोप्रा पहिल्या क्रमांकावर आहे. अंतिम सामन्याच्या पहिल्याच प्रयत्नात नीरज अपयशी ठरला होता. त्याने फाऊल केले पण दुसऱ्या फेरीत 88.17 मीटर फेक करून गटात अव्वल स्थान पटकावले. नीरज चोप्राच्या विजयावर ग्रामस्थ व कुटुंबीयांनी टाळ्या वाजवून आणि शिट्ट्या वाजवून भारत माता की जय घोषणा दिल्या. पाकिस्तानचा खेळाडू नदीमनेही नीरजचे अभिनंदन केले.

बुडापेस्ट, हंगेरी येथे सुरू असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजच्या कामगिरीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. संपूर्ण देशाचे आशीर्वाद आणि प्रार्थना नीरजच्या पाठीशी असल्याचे वडील सतीश कुमार यांनी सांगितले. आई सरोज देवी म्हणाल्या होत्या की, मुलगा यावेळी पुन्हा सुवर्ण जिंकेल, याची त्यांना खात्री आहे. ज्यावर नीरज चोप्रा खरा उतरल्याचा पाहायला मिळाला.

- Advertisment -