घरक्रीडाNeeraj Chopra: सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रासाठी भारत सरकारने केला तब्बल सात...

Neeraj Chopra: सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रासाठी भारत सरकारने केला तब्बल सात कोटी रुपयांचा खर्च

Subscribe

आशियाई स्पर्धेनंतर नीरजच्या हाताला प्रंचड मोठी दुखापत झाली त्याच्या हाताचा कोपर दुखावला त्याला असह्य वेदना होण्यास सुरुवात झाली.

भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावून देणारा नीरज चोप्रा सध्या यशाच्या उंच शिखरावर विराजमान आहे. नीरजने संपादन केलेल्या अभूतपुर्व यशामुळे भारतासाठी शनिवारचा दिवस खरचं ऐतिहासिक ठरला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले अशी चर्चा त्रिवर घुमत आहे. तब्बल 13 वर्षानंतर ऑलिंम्पिकमध्ये भारतीय तिरंगा उंचावला.आणि ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रगीत ऐकू आले. नीरजचा इथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासामागे अनेक लोकांनी त्याला मोलाची साथ दिली तसेच त्याच्या याशामागे भारत सरकारचाही महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. सरकारने नीरजसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. नीरजने ८७.५८ मीटर अंतराची नोंद करत सुवर्णपदकाची कमाई केली. नीरजने अनेक पुरस्कार त्याच्या नावावर केले आहेत. यापुर्वी त्याने 2016 मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.तसेच 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने 86.48 मीटर लांब भालाफेक करुन त्याने सुवर्णपदक पटकावले अणि 20 वर्षाखालील गटात विश्वविक्रमाची नोंद केली होती. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कामगिरी करत असताना नीरजने 2018 सालच्या आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेत पुन्हा एकदा सुवर्ण पदक स्वत:च्या नावावर केले. त्याने 88.07 मीटर भालाफेक करत स्वत:च्याच नावावरील राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. तसेच 2018 च्या आशियाई स्पर्धेत नीरज भारताचा ध्वजधारक होता.

नीरजला दुखापत-

- Advertisement -

आशियाई स्पर्धेनंतर नीरजच्या हाताला प्रंचड मोठी दुखापत झाली त्याच्या हाताचा कोपर दुखावला त्याला असह्य वेदना होण्यास सुरुवात झाली. यामुळे त्याला भालाफेक करताना अडचण होऊ लागली. 2019 साळी त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली यानंतर तो पुढील सरावा करीता पुनर्वसन केंद्रात गेला. नीरजने त्याच्या सरावात सातत्य ठेवत आणि प्रचंड मेहनत केल्याने 2020 साली झालेल्या दक्षिण अफ्रिकेत स्पर्धेतून त्यांने 87.86 मीटर लांब भालाफेक करुन कमबॅक केलं तसेच टोकीयो ऑलिम्पिकचे दार त्याच्यासाठी खुलं झाले. नोव्हेबंर 2018 मध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीममध्ये नीरजचा प्रवेश मिळाला. पुढे युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयं खेळाडूंचे वार्षिक सराव आणि स्पर्धकांचे वेळापत्रक तयार करण्यात आलं आणि त्यातूनच ॲथलेटिक्स महासंघाला काही निधी देण्यात आला या निधीमधून नीरजवर काही रक्कम खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारने नीरजवर केला कोट्यवधींचा खर्च

- Advertisement -

परदेशात झालेल्या स्पर्धा व प्रशिक्षणासाठी नीरजव तब्बल 4 कोटी 87 लाख 39 हजार 639 रुपये खर्च करण्यात आले. नीरजच्या प्रशिक्षकांचा पगार 1 कोटी 22 लाख 24 हजार 880 रुपये तसेच भालाफेक आणि इतर क्रीडा साहित्यासाठी लागणारा खर्च 4 लाख 35 हजार इतका होता. 2016 ते 2021 या कालावधीत नीरजवर भारत सरकारने जवळपास 7 कोटी रुपये खर्च केले होते. नीरजने भारत सरकारने केलेल्या खर्चाचे चीज केलं आणि ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या कामगिरीचा डंका वाजवला. विजयानंतर देखील नीरज चोप्रावर बक्षीसांचा वर्षाव झाला. त्याच्यासाठी जवळपास 16.75 कोटी रुपयांच्या बक्षीसांची घोषणा करण्यात आली.


हे हि वाचा -सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा होता स्थुलतेमुळे हैराण, लोकं सरपंच म्हणून चिडवायचे

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -