घरक्रीडाAsian games 2018: भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी

Asian games 2018: भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी

Subscribe

१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आठवे सुवर्णपदक मिळाले आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे

जकार्तात सुरु असलेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नवव्या दिवशीदेखील भारताने सुवर्ण कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये भारताला आठवे सुवर्ण पदक मिळाले आहे. भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले आहे. नीरजने ८८.०६ मीटर भाला फेकून या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत भारताच्या नावावर इतिहास रचला आहे. १८ व्या आशियाई क्रीया स्पर्धेत भारताला आतापर्यंत ४० पदक मिळाले आहेत.

- Advertisement -

१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज झालेल्या सामन्यामध्ये भारताने एक सुवर्ण पदक, तीन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील नीरज चोप्राचे हे पहिले सुवर्ण पदक आहे. त्याने याआधी आशियाई स्पर्धेत अजिंक्यपद आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते.

- Advertisement -

‘माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे एक चांगले व्यक्तीमत्व आहे. हे सुवर्णपदक मी अटलजींना समर्पित करतो.देशाला मी सुवर्णपदक जिंकून देऊ शकलो. याचा मला खूप अभिमान आहे. अंतिम फेरी चांगली झाली. माझा सराव चांगला झाला होता त्यामुळे मला हे सुवर्ण पदक जिंकता आले’, नीरज चोप्राने एएनआयला प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -