Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Neeraj Chopra World Champion : फोटो सेशनला अर्शद नदीमला बोलावून 'गोल्डन बॉय'ने...

Neeraj Chopra World Champion : फोटो सेशनला अर्शद नदीमला बोलावून ‘गोल्डन बॉय’ने जिंकली मने

Subscribe

Neeraj Chopra World Champion : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास रचला आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे येथे सुरू असलेल्या World Athletics चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने 88.17 मीटर भालाफेक करत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा पराभव करून नीरज चोप्रा चॅम्पियन बनला. सामन्यानंतर नीरज चोप्राने अर्शद नदीमला फोटोसाठी बोलावून पुन्हा एकदा आपल्या खास स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली. नीरज चोप्राच्या या दिलदारपणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Neeraj Chopra World Champion Golden Boy wins hearts by inviting Arshad Nadeem for photo session)

हेही वाचा – Neeraj Chopra ने इतिहास रचला, World Athletics चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय

- Advertisement -

6 राऊंडच्या अंतिम फेरीत नीरजने पहिल्या फेरीत फाऊल केला होता, मात्र दुसऱ्या फेरीतच त्याने जास्तीत जास्त अंतरापर्यंत भाला फेकून देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. नीरज चोप्राने उर्वरित 4 फेऱ्यांपर्यंत आघाडी कायम राखली. दुसऱ्या फेरीत नीरजने 88.17 मीटर, तिसऱ्या फेरीत 86.32 मीटर, चौथ्या फेरीत 84.64 मीटर, पाचव्या फेरीत 87.73 मीटर आणि सहाव्या फेरीनंतर पहिल्या फेरीत 83.98 मीटर भालाफेक केला.

हेही वाचा – ऐतिहासिक कामगिरीबद्दल ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रावर शुभेच्छांचा वर्षाव

- Advertisement -

नीरजचा मुख्य प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला, त्यामुळे त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी झेक प्रजासत्ताकच्या जेकब वेडलेचने 86.67 मीटरपर्यंत भालाफेक करून कांस्यपदकावर आपले नाव कोरले. आणखी दोन भारतीय खेळाडू किशोर जेनाने 84.77 मीटर आणि डीपी मनूने अंतिम फेरीत 84.14 मीटर भालाफेक केला. जेना पाचव्या आणि मनू यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

नीरज चोप्राने जिंकली चाहत्यांची मने

नीरज चोप्राने सामन्यानंतर पुन्हा एकदा आपल्या खास स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेली कटुता विसरून नीरज चोप्राने अर्शद नदीमला फोटोसाठी बोलावले. यानंतर त्याने त्याच्याशी हस्तांदोलन करून मिठी मारली. यावेळी झेक प्रजासत्ताकचा जाकुब वेडलेचही त्याठिकाणी उपस्थित असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

- Advertisment -