Neeraj Chopra: पालकांसोबत केला हवाई प्रवास, नीरज चोप्राची स्वप्नपूर्ती

Neeraj chopra travel with parents

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राने आपले अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पुर्ण केले. आपल्या पाल्यांना पहिला वहिला असा विमान प्रवास घडवल्याचे समाधान त्याने ट्विटर पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. माझं एक छोट स्वप्न आज खर झाल आहे, मी माझ्या पालकांसोबत आज विमान प्रवास करतोय, अशा शब्दात नीरज चोप्राने आपला आनंद व्यक्त केला आहे. शनिवारी सकाळी आपले हे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचे ट्विट नीरज चोप्राने केले आहे. काही दिवसांपूर्वीच नीरज चोप्राने आपल्या नियमित खेळाच्या सरावातून ब्रेक घेत असल्याचे सांगितले होते. (Neeraj Chopras dream come true as he takes parents for first air travel)

जुलै महिन्यातच नीरज चोप्राने आपण ब्रेक घेत असल्याचे सांगतानाच २०२१ चा स्पर्धेच्या कालावधीत थोडा ब्रेक घेत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता २०२२ मध्ये पुन्हा एकदा एशियन गेम्सच्या निमित्ताने आणि कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने मी पुन्हा सराव सुरू करेन असे नीरज चोप्राने स्पष्ट केले होते. मी टोक्यो स्पर्धेतून परतल्यापासून मला अनेकांकडून प्रेम मिळाले आहे. आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमामुळेच मी अत्यंत आनंदी आहे, आपण दाखवलेल्या प्रेमासाठी मी सर्वांचे आभार मानत असल्याचे नीरजने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून म्हटले.

मला संपुर्ण प्रवासाचे भरगच्च असे शेड्युल्ड आहे. त्यामुळेच मी अजुनही सरावाला सुरूवात केलेली नाही. मी २०२१ साठीचे वेळापत्रक थोडे कमी करत आहे. येत्या २०२२ मध्ये मी पुन्हा जोमाने या स्पर्धेसाठी सुरूवात करेन असेही नीरज चोप्राने आपल्या पोस्टमध्ये म्हटेल आहे. येत्या २०२२ च्या एशियन आणि कॉमनवेल्थ गेम्ससाठी मी आणखी तयारीने उतरेन असे नीरज चोप्राने म्हटले आहे.

नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अतिशय चमकदार कामगिरी करत ८७.५८ मीटर अंतराच्या भाला फेकण्याचा विक्रम नोंदवला. पण त्यानंतर जॅव्हेलिनच्या निमित्ताने झालेल्या पाकिस्तानच्या वादामुळे काहीसा नकोसा असा लोकांचा रस दिसून असल्याचेही नीरज चोप्राने आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते. पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा जॅव्हलीन घेतल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.