घर क्रीडा पाकिस्तानच्या अर्शद नदीमविषयी बोलल्या नीरज चोप्राच्या आई; शब्दांनी अनेकांच्या हृदयाला घातला हात

पाकिस्तानच्या अर्शद नदीमविषयी बोलल्या नीरज चोप्राच्या आई; शब्दांनी अनेकांच्या हृदयाला घातला हात

Subscribe

नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) रविवारी (27 ऑगस्ट) रात्री हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे इतिहास रचला आहे. त्याने World Athletics चॅम्पियनशिपमध्ये 88.17 मीटर भालाफेक करत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. नीरज चोप्राने अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा (Arshad Nadeem) पराभव केला. या विजयानंतर नीरज चोप्राच्या आई सरोज देवी (Saroj Devi) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (Neeraj Chopras mother talks about Pakistan’s Arshad Nadeem; The words touched the hearts of many)

हेही वाचा – Asia Cup 2023 : श्रीलंकेला मोठा धक्का; आशिया चषकातून चार मोठे खेळाडू बाहेर

- Advertisement -

नीरज चोप्राने आपला प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमचा पराभव करून World Athletics चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्राच्या कुटुंबियांसह त्यांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हा सामना पाहिला. नीरज चोप्राच्या विजयानंतर काही पत्रकार त्याच्या गावात गेले आणि त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी नीरज चोप्राच्या आईला प्रश्न विचारण्यात आला की, तुमच्या मुलाने पाकिस्तानी खेळाडूला हरवले तेव्हा तुम्हाला कसे वाटले? नीरज चोप्राची आई सरोज देवी यांच्या वक्तव्याने अनेकांच्या हृदयाला हात घातला आहे.

- Advertisement -

सरोज देवी म्हणाल्या की, मैदानात उतरल्यावर खेळाडू हा खेळाडू असतो. सर्वच खेळण्यासाठी आलेले असतात. मग ते कुठून आले याने काही फरक पडत नाही. त्यांच्यापैकी कोणी ना कोणी जिंकरणाच आहे. मग त्यांच्यामध्ये पाकिस्तानचा खेळाडूंचा समावेश असला तरीही काहीच गैर नाही. मला आनंद आहे की, पाकिस्तानी खेळाडू (अर्शद नदीम) देखील जिंकला आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम हे दोघेही चांगले मित्र आहेत. ते अनेकदा स्पर्धेच्या मध्यभागी एकमेकांना मिठी मारताना दिसले आहेत. अर्शद नदीमने स्वत: अनेकवेळा सांगितले आहे की, आपले वैर नीरज चोप्राशी नाही. नीरज चोप्रानेही हे सत्य मान्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.

हेही वाचा – Asia Cup 2023: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; आता वर्ल्ड कप, आशिया चषक पाहा फुकटात

नीरज चोप्राने भारतासाठी जिंकेल पहिले सुवर्ण

World Athletics चॅम्पियनशिपमध्ये 6 राऊंडच्या अंतिम फेरीत नीरजने पहिल्या फेरीत फाऊल केला होता, मात्र दुसऱ्या फेरीतच त्याने जास्तीत जास्त अंतरापर्यंत भाला फेकून देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. नीरज चोप्राने उर्वरित 4 फेऱ्यांपर्यंत आघाडी कायम राखली. दुसऱ्या फेरीत नीरजने 88.17 मीटर, तिसऱ्या फेरीत 86.32 मीटर, चौथ्या फेरीत 84.64 मीटर, पाचव्या फेरीत 87.73 मीटर आणि सहाव्या फेरीनंतर पहिल्या फेरीत 83.98 मीटर भालाफेक केला. नीरजचा मुख्य प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला, त्यामुळे त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी झेक प्रजासत्ताकच्या जेकब वेडलेचने 86.67 मीटरपर्यंत भालाफेक करून कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

- Advertisment -