घरक्रीडानेपाळच्या नवख्या फलंदाजाने केली कोणालाही न जमलेली कामगिरी; IPL मध्ये मिळणार संधी?

नेपाळच्या नवख्या फलंदाजाने केली कोणालाही न जमलेली कामगिरी; IPL मध्ये मिळणार संधी?

Subscribe

त्याने टी-२० क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी केल्याने भविष्यात त्याच्यासाठी आयपीएलची दारेही खुली होऊ शकतील. 

जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) १४ वे पर्व सध्या सुरु आहे. या स्पर्धेत भारतासह जवळपास सर्वच देशांचे प्रमुख खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर सध्या फार कोणाचे लक्ष नाही. मात्र, नेपाळच्या एका नवख्या फलंदाजाने दमदार कामगिरी करत चाहत्यांना आपली दखल घ्यायला लावली आहे. कुशल भुरतेल असे या नेपाळच्या युवा फलंदाजाचे नाव असून त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची विक्रमी सुरुवात केली आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी केल्याने भविष्यात त्याच्यासाठी आयपीएलची दारेही खुली होऊ शकतील.

पहिल्या तिन्ही सामन्यांत अर्धशतक

कुशल भुरतेलने १७ एप्रिलला हॉलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आपल्या पहिल्याच सामन्यात सलामीला येताना त्याने ४६ चेंडूत ६२ धावांची खेळी करत नेपाळला विजय मिळवून दिला. पुढील सामन्यात त्याने मलेशियाविरुद्ध ४१ चेंडूत नाबाद ६१ धावांची खेळी केली आणि पुन्हा नेपाळला विजय मिळवण्यात यश आले. त्यानंतर त्याने तिसऱ्या सामन्यात ४६ चेंडूत ६२ धावा केल्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या पहिल्या तिन्ही सामन्यांत अर्धशतक करणारा कुशल हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

- Advertisement -

तीन सामन्यांत ११ षटकार

त्याने या तीन सामन्यांत मिळून ९२.५० च्या सरासरीने आणि १३९.०९ च्या स्ट्राईक रेटने १८५ धावा केल्या आहेत. त्याने या तीन सामन्यांत ११ षटकारही मारले आहेत. आता त्याने पुढेही चांगली कामगिरी सुरु ठेवण्यास त्याला पुढील वर्षी आयपीएलमध्येही संधी मिळू शकेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -