घरक्रीडाटी-20 विश्वचषक : 'पाकिस्तान'ची नवी जर्सी लीक; चाहत्यांनी उडवली खिल्ली

टी-20 विश्वचषक : ‘पाकिस्तान’ची नवी जर्सी लीक; चाहत्यांनी उडवली खिल्ली

Subscribe

टी-20 विश्वचषकासाठी प्रत्येक संघ नव्या जर्सीचे अनावरण करत आहे. भारतीय संघाने नुकताच आपल्या नवीन जर्सीचे आनवरण केले. त्यानंतर आता पाकिस्तानचा संघही नव्या जर्सीत खेळणार असल्याची चर्चा रंगली असतनाच, पाकिस्तानच्या संघाच्या जर्सीचे काही फोटो सोशल माडियावर लीक झाले आहेत.

टी-20 विश्वचषकासाठी प्रत्येक संघ नव्या जर्सीचे अनावरण करत आहे. भारतीय संघाने नुकताच आपल्या नवीन जर्सीचे आनवरण केले. त्यानंतर आता पाकिस्तानचा संघही नव्या जर्सीत खेळणार असल्याची चर्चा रंगली असतनाच, पाकिस्तानच्या संघाच्या जर्सीचे काही फोटो सोशल माडियावर लीक झाले आहेत. मात्र, या जर्सीचे फोटो बघताच चाहत्यंनी ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. (New Pakistan cricket team jersey viral on social media)

सोशल मीडियावर पाकिस्तान कर्णधार बाबर आझमसह अन्य खेळाडूंचे नव्या जर्सीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोची चाहत्यांनी खिल्ली उडवली आहे. मात्र, अद्याप पाकिस्तान संघाची कोणतीही अधिकृत जर्सी समोर आलेली नाही. त्यामुळे ही बनावट जर्सी असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

पाकिस्तानच्या व्हायरल होत असलेल्या नव्या जर्सीवर कलिंगडचे चित्र प्रिंट करण्यात आले आहे. तसेच, कलिंगडची प्रिंट असलेली नवी जर्सी घातलेला बाबर आझमचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याच फोटोला अनेक नेटीझेन्सनी ट्रोल केले आहे.

नव्या जर्सीचे अनावरण

- Advertisement -

भारतीय संघानेही नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. भारतीय संघाची नवी जर्सी निळ्या रंगाची असून, त्यावर 3 स्टार प्रिंट करण्यात आले आहेत. भारतीय संघाच्या या नव्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या नव्या जर्सीच्या खरेदीसाठी पसंती दाखवली आहे.

ऑक्टोबर महिन्यात टी-20 विश्वचषक स्पर्धा

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या 7 शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जाणार आहेत. तसेच, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.

टी-20 विश्वचषकासाठी भारत आणि पाकिस्तान संघ

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

राखीव खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चहर.

पाकिस्तान संघ : बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफरीदी, शान मसूद, उस्मान कादिर.

राखीव : मोहम्मद हारिस, फखर जमान आणि शाहनवाज दहानी.


हेही वाचा – T20 World Cup: टीम इंडियाची नवीन जर्सी लॉन्च, पाहा काय आहेत वैशिष्ट्य!

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -