Eco friendly bappa Competition
घर क्रीडा WTC फायनलमध्ये नवे नियम लागू; जाणून घ्या काय झाले बदल

WTC फायनलमध्ये नवे नियम लागू; जाणून घ्या काय झाले बदल

Subscribe

नवी दि्लली : आयसीसीच्या जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ दोन दिवसांनी (7 जून) लंडनमधील ओव्हल मैदानावर आमनेसामने येणार आहेत. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते टेस्ट चॅम्पियनशिपची आतुरतेने वाट बघत असून हा अंतिम सामना नव्या नियमांमुळे अधिकच चर्चेत येणार आहे. (New Rules in WTC Finals; Find out what has changed)

भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने 2021 मध्ये साउथॅम्प्टनमध्ये न्यूझीलंडसोबत अंतिम सामना खेळला होता. परंतु भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. पण यावेळी भारतीय संघाला जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना जिंकण्याची संधी आहे. कारण काही महिन्यांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा भारतीय संघाने कसोटी मालिकेत 2-1 ने पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा पराभव करून जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदावर आपले नाव कोरण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.

- Advertisement -

आयसीसीने सांगितले की, मैदानावरील अंपायरला यापुढे निर्णय जाहीर करताना टीव्ही अंपायरला सॉफ्ट सिग्नल देण्याची आवश्यकता नाही. बहुतेक वेळा कठीण झेल पकडल्यावर त्याची पुष्टी करणे अंपायरला सोपे जात नव्हते. त्यामुळे आयसीसीने अंपायरला झेलची पुष्टी होईपर्यंत ‘सॉफ्ट सिग्नल’ सांगण्याची मुभा दिली होती. यानुसार मैदानावरील अंपायरला एखाद्या निर्णयाबाबत शंका असल्यास ते तिसऱ्या पंचाची मदत घेत होते. या दरम्यान ते फलंदाजाला सॉफ्ट सिग्नलनुसार बाद आहे की नाही हे सांगत होते. मैदानावरील अंपायरच्या सॉफ्ट सिग्नलचा थर्ड अंपायरच्या निर्णयाशी खूप संबंध असतो. जेव्हा मैदानावरील अंपायर कोणत्याची अचूक निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा तो फक्त सॉफ्ट सिग्नल देऊ शकत होता. परंतु आता मैदानावरील अंपायर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी टीव्ही अंपायरचा सल्ला घेतील. त्यामुळे येत्या 1 जूनपासून ‘सॉफ्ट सिग्नल’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू होताना दिसणार नाही.

डे-नाईट खेळवली जाऊ शकते WTC ची फायनल
भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या वेळी ढगाळ वातावरण असेल आणि नैसर्गिक प्रकाश तितकासा चांगला नसेल तर अंतिम सामना डे-नाईट खेळवला जाऊ शकतो. याशिवाय या सामन्यासाठी राखीव दिवस (12 जून) ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

हेल्मेटबाबत नवीन नियम
जास्त जोखीम असलेल्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आता आयसीसीनं 1 जूनपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हेल्मेट अनिवार्य केले आहे. तसेच फलंदाजांना वेगवान गोलंदाजांचा सामना करताना हेल्मेट अनिवार्य असेल. याशिवाय जेव्हा यष्टीरक्षक स्टंपच्या जवळ उभा असेल आणि फलंदाजासमोर क्षेत्ररक्षक करताना खेळाडू उभा असेल तर त्याला हेल्मेट घालावे लागेल.

फ्री हिट नियमात बदल
फ्री हिट नियमात किरकोळ बदल करण्यात आला आहे. चेंडू स्टंपला लागल्यावर फ्री हिटवर काढलेली कोणतीही धाव यापुढे मोजली जाणार आहे. याचा अर्थ असा की, फ्री हिटवर गोलंदाजाने टाकलेला चेंडू स्टम्पवर लागल्यावर यापुढे फलंदाज धाव घेऊ शकणार आहे. आयसीसीचे सर्व नवीन बदल येत्या बदल 1 जून 2023 पासून लागू होतील.

जागतिक टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना
लंडनच्या द ओव्हल मैदानावर 7 जून ते 11 जून या दरम्यान जागतिक टेस्ट चॅम्पियनसिपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यात भारत वि. ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या अंतिम सामन्यात जर काही विघ्न आल्यास एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

- Advertisment -