टी-20 विश्वचषक : न्यूझीलंड संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश; आयर्लंडचा 35 धावांनी पराभव

टी-20 विश्वचषक 2022च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाने प्रवेश मिळवला आहे. न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 35 धावांनी आयर्लंडचा पराभव केला आणि 7 गुणांसह उपांत्य फेरी गाठली. आयर्लंडने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.

टी-20 विश्वचषक 2022च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाने प्रवेश मिळवला आहे. न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 35 धावांनी आयर्लंडचा पराभव केला आणि 7 गुणांसह उपांत्य फेरी गाठली. आयर्लंडने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने चांगली सुरूवात केली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी नोंदवली. (New Zealand enter the semi finals of the T20 World Cup by beat Ireland by 35 runs)

न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात केन विलियमसनने 35 चेंडूत 61 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाने मोठा विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून 20 षटकांत 6 बाद 185 धावांचे आव्हान आयर्लंडसमोर ठेवले होते.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने चांगली सुरूवात केली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी नोंदवली. मात्र फिन ॲलेन 32 धावांवर बाद झाला आणि न्यूझीलंडला पहिला झटका बसला. त्यानंतर डेव्होन कॉनवे देखील (28) धावा करून तंबूत परतला. मात्र, कर्णधार केन विलियमसनने संघाची धुरा सांभाळली. त्याने 35 चेंडूत 61 धावा केल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये डेरी मिचेलने 31 धावांची तुफानी खेळी केली. आयर्लंडकडून जोशुआ लिटलने हॅटट्रिक घेऊन सर्वाधिक 3 बळी पटकावले. गॅरेथ डेलनीने 2 बळी घेतले तर मार्क अडायरला 1 बळी घेण्यात यश आले.

न्यूझीलंडने दिलेल्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात केली होती. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बालबर्नी यांनी 68 धावांची भागीदारी नोंदवली. मात्र ईश सोधी आणि मिचेल सॅंटनर यांनी आयर्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर कोणत्याच फलंदाजाला चांगली खेळी करण्यात यश आले नाही. न्यूझीलंड संघाकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर टिम साऊदी, मिचेल सॅंटनर आणि ईश सोधी यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.


हेही वाचा – भारताला हरवल्यास झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करीन; पाकिस्तानी अभिनेत्रीची झिम्बाब्वेच्या संघाकडे अजब मागणी