घरक्रीडान्यूझीलंडने दिला बांगलादेशला व्हाईटवॉश

न्यूझीलंडने दिला बांगलादेशला व्हाईटवॉश

Subscribe

टीम साऊथीने घेतलेल्या ६ विकेटच्या जोरावर न्यूझीलंडने तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर ८८ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे न्यूझीलंडने ३ सामन्यांची ही मालिका ३-० अशी जिंकली. याआधी न्यूझीलंडने या मालिकेतील पहिले दोन्ही सामने ८ विकेट राखून जिंकले होते.

तिसर्‍या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने रॉस टेलर (६९), हेन्री निकोल्स (६४) आणि कर्णधार टॉम लेथम (५९) यांच्या चांगल्या फलंदाजीमुळे ५० षटकांत ६ विकेट गमावत ३३० धावांचा डोंगर उभारला. बांगलादेशकडून मुस्तफिझूर रहमानने ९२ धावांच्या मोबदल्यात २ विकेट घेतल्या.

- Advertisement -

याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव २४२ धावांत आटोपला. शब्बीर रहमानने १०२ धावा करून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चांगली झुंज दिली. त्याला मोहम्मद शैफुद्दीन (४४) आणि मेहिदी हसन (३७) यांनी चांगली साथ दिली, मात्र ३३० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना मोठ्या भागीदारी करण्याची गरज होती आणि त्यात बांगलादेशी फलंदाज अपयशी ठरले. न्यूझीलंडकडून एकदिवसीय संघात पुनरागमन करणार्‍या साऊथीने ९.२ षटकांत ६५ धावा देत ६ विकेट घेतल्या.

टेलरची विक्रमला गवसणी

- Advertisement -

या सामन्यादरम्यान रॉस टेलर न्यूझीलंडकडून खेळताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. टेलरने स्टिफन फ्लेमिंगच्या ८,००७ धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. टेलरने २१८ सामन्यांच्या २०३ डावांत ४८.३२ च्या सरासरीने ८,०२६ रन केल्या आहेत. यात २० शतके आणि ४७ अर्धशतकांचा समावेश आहे, तर फ्लेमिंगने न्यूझीलंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८,००७ धावा केल्या होत्या. टेलर हा न्यूझीलंडकडून खेळताना सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला असला, तरी त्याला न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्यासाठी अजून ११ धावांची गरज आहे. फ्लेमिंगने आयसीसी वर्ल्ड-११ कडून खेळताना ३० रन केल्या होत्या. यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये फ्लेमिंगच्या एकूण ८,०३७ धावा आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -