घरक्रीडान्यूझीलंडकडून ३४७ धावांच्या मोठ्या फरकाने आयर्लंडचा पराभव

न्यूझीलंडकडून ३४७ धावांच्या मोठ्या फरकाने आयर्लंडचा पराभव

Subscribe

न्यूझीलंड महिला संघ (New Zealand) आणि आयर्लंड महिला संघ (Ireland) यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात (ODI Match) न्यझीलंडने ३४७ धावांच्या मोठ्या फरकाने आयर्लंडचा पराभव केला. डब्लिन येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंडने तुफानी खेळी केली.

न्यूझीलंड महिला संघ (New Zealand) आणि आयर्लंड महिला संघ (Ireland) यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात (ODI Match) न्यझीलंडने ३४७ धावांच्या मोठ्या फरकाने आयर्लंडचा पराभव केला. डब्लिन येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंडने तुफानी खेळी केली. निर्धारित ५० षटकांत ४ बाद ४१९ धावा केल्या. आक्रमक खेळी आणि मोठी धावसंख्या केल्यामुळे क्रिडी विश्वात न्यूझीलंडच्या महिला खेळाडूंची चांगलीच चर्चा रंगली आहे. (New Zealand highest women ODI score 491 against Ireland)

या सामन्यात नाणेफेक (Toss) जिंकत न्यूझीलंडची कर्णधार सुझी बेट्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानुसार फलंदाजी करताना सलामीवीर बेट्स आणि जेस वॉटकिन यांनी आक्रमक खेळी केली. या दोन फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी केली.

- Advertisement -

हेही वाचा – न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर

मात्र, आयर्लंडची गोलंदाज जेसने आपल्या गोलंदाजीत गॅबी लुईसला बाद केले. गॅबीने ५९ चेंडूत १० चौकार मारत ६२ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मॅडी ग्रीनने संघाचा डाव सावरला. मॅडी ग्रीन आणि बेट्स यांनी आपल्या तुफानी खेळीच्या जोरावर आयर्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोन फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली.

- Advertisement -

परंतु, ९४ चेंडूत १५१ धावा केल्यानंतर बेट्स बाद झाली. बेट्सने आपल्या खेळीत २४ चौकार आणि २ षटकार मारले. त्यानंतर मॅडी ग्रीनने शतकी खेळी केली. ७७ चेंडूत १५ चौकार आणि १ षटकार मारत १२२ धावा केल्या. अमेलिया केरनेही ८१ धावांची नाबाद खेळी खेळली. तिने ४५ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकार ठोकले. एवढेच नाही तर संघाला ३१ अतिरिक्त धावाही मिळाल्या. आयर्लंडकडून कारा मरेने २ तर लारा मारिट्झ आणि गॅबीने १-१ विकेट घेतली.

दरम्यान, न्यूझीलंडने दिलेल्या ४१९ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघाला चांगली कामगिरी करता आली. आयर्लंडचा संघ ३५.३ षटकांत सर्वबाद १४४ धावांत आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना ३४७ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.


हेही वाचा – T20 विश्वचषकासाठी दिनेश कार्तिकपेक्षा ‘हा’ खेळाडू आफ्रिकेसाठी ठरू शकतो घातक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -