घरक्रीडाNZ VS PAK : तब्बल १८ वर्षांनी न्यूझीलॅंड संघ पाकिस्तानात

NZ VS PAK : तब्बल १८ वर्षांनी न्यूझीलॅंड संघ पाकिस्तानात

Subscribe

न्यूझीलॅंड क्रिकेट संघ तब्बल १८ वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर क्रिकेट सामने खेळण्यासाठी दाखल झाला आहे. हे सामने रावलपिंडी आणि लाहौर च्या क्रिकेट मैदानांवर खेळवले जाणार आहेत. इस्लामाबाद विमानतळावर न्यूझीलॅंडच्या खेळाडूंचे आगमन झाल्यानंतर त्यांना भक्कम सुरक्षारक्षकांच्या देखरेखी खाली त्यांच्या हॉटेल्स पर्यंत पोहचवण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ने न्यूझीलॅंडचे खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या हॉटेलमध्ये बायो-बबल, बायो-सुरक्षित वातावरणाची व्यवस्था केली आहे. न्यूझीलंडने यापूर्वी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी २००३ मध्ये पाकिस्तानचा शेवटचा दौरा केला होता.

- Advertisement -

साल २००३ नंतर न्यूझीलॅंड संघाने पाकिस्तानात सुरक्षेच्या कारणास्तव एकही दौरा केला नाही. टॉम लेथमच्या नेतृत्वात न्यूझीलॅंड संघ आपल्या प्रमुख कर्णधार केन विल्यमसन आणि काही प्रमुख खेळाडूंशिवाय पाकिस्तानात दाखल झाला आहे. न्यूझीलॅंडचे काही खेळाडू इंडियन प्रिमियर लीग (IPL) मध्ये भाग घेत आहेत तर काहींनी विश्रांती घेतली आहे. त्यातच न्यूझीलॅंडचे प्रमुख कोच गॅरी स्टीड सुद्धा या दौऱ्यात संघा सोबत नाही आहेत.

न्यूझीलॅंड पाकिस्तान विरुद्ध रावलपिंडीत तीन एकदिवसीय सामने आणि लाहौरमध्ये पाच टी-२० सामने खेळणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि न्यूझीलंड क्रिकेटने वर्ल्डकप सुपर लीग अंतर्गत पुढील आठवड्यातील एकदिवसीय मालिका “डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम” (DRS)च्या अनुपलब्धतेमुळे न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ती द्विपक्षीय मालिका असेल.

- Advertisement -

दोन्ही क्रिकेट मंडळांनी सहमती दर्शवली आहे की, ५० षटकांचे सामने आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी पात्र होण्याचा भाग असतील. न्यूझीलंडच्या संघात उद्या काही प्रमुख खेळाडू सामील होतील. हे खेळाडू बांगलादेशमध्ये नुकत्याच खेळल्या गेलेल्या टी -२० मालिकेचा भाग नव्हते. यामध्ये डॅरिल मिशेल, टॉड एस्टल, ईश सोधी, मार्क चॅपमन आणि मार्टिन गुप्टिल हे टी -२० संघात सामील होतील. दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यूझीलॅंड संघ २०२२-२३ साली पुन्हा पाकिस्तानचा दौरा करणार आहे.


हेही वाचा : US OPEN 2021 : जोकोव्हिचचा नवा पराक्रम, ५२ वर्षांचा विक्रम काढणार मोडीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -