घरक्रीडान्यूझीलंडची दुसर्‍या स्थानी झेप, भारतच अव्वल स्थानी

न्यूझीलंडची दुसर्‍या स्थानी झेप, भारतच अव्वल स्थानी

Subscribe

श्रीलंकेकडून घरच्याच मैदानावर मालिका गमावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे कसोटी क्रमवारीमध्ये नुकसान झाले आहे. द.आफ्रिका कसोटी क्रमवारीत दुसर्‍या स्थानावरून तिसर्‍या स्थानी गेला आहे. द.आफ्रिका १ स्थान खाली घसरल्याचा फायदा न्यूझीलंडला झाला आहे. न्यूझीलंडचा संघ क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडची कसोटी क्रिकेटमधली ही सर्वोत्तम क्रमवारी आहे. या क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर कायम आहे. भारताच्या खात्यात ११६ तर न्यूझीलंडच्या खात्यात १०७ गुण आहेत.

द.आफ्रिकेत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचा श्रीलंकेला मात्र क्रमवारीत फायदा झालेला नाही. श्रीलंका सहाव्या स्थानावर कायम आहे. श्रीलंकेचे ९३ गुण आहेत. द.आफ्रिका १०५ गुणांसह तिसर्‍या, ऑस्ट्रेलिया १०४ गुणांसह चौथ्या आणि इंग्लंडही १०४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

- Advertisement -

फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये श्रीलंकेच्या कुशल मेंडिस आणि ओशाडा फर्नांडो यांना फायदा झाला आहे. मेंडिस १८ व्या स्थानावर आहे, तर फर्नांडोला ३५ स्थानांची बढती मिळाल्याने तो ६५ व्या स्थानी पोहोचला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे. गोलंदाजांमध्ये द.आफ्रिकेचा डुआन ऑलिव्हर १९ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा सुरंगा लकमला तीन स्थानांची बढती मिळाल्यामुळे तो ३० व्या क्रमांकावर आणि विश्वा फर्नांडो ४३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा रविंद्र जाडेजा पाचव्या आणि रविचंद्रन अश्विन दहाव्या क्रमांकावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -