घरक्रीडाIPL Mega Auction 2022 : आयपीएलमध्ये १०.७५ कोटींचा पाऊस पडल्यानंतर निकोलस पूरनने...

IPL Mega Auction 2022 : आयपीएलमध्ये १०.७५ कोटींचा पाऊस पडल्यानंतर निकोलस पूरनने दिली पिझ्झा पार्टी

Subscribe

आयपीएल २०२२ ची लिलाव प्रक्रिया १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात आली. तर काही खेळाडूंचं नशीब फुटकं निघालं. परंतु वेस्टइंडिजचा सलामीवीर फलंदाज निकोलस पूरन आयपीएल स्पर्धेच्या रडारवर आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात त्याला जास्त पैसे मिळतील अशी अपेक्षा नव्हती. परंतु निकोलसचं नशीब पलटलं असून त्याच्या नावावर संघांनी खजिना उघडला होता.

निकोलसवर अनेक संघांनी त्याच्यासाठी बोली लावली होती. यावेळी १०.७५ कोटींची कमाई पूरनने केली असून त्याने पिझ्झा पार्टी दिली आहे. बायो बबलमध्ये असल्यामुळे त्याने त्याच्या सहकारी खेळाडूंना पिझ्झा पार्टी दिली. या पिझ्झा पार्टीसाठी त्याला १५ हजार रूपये मोजावे लागले.

- Advertisement -

आयपीएलमध्ये २०२१ च्या सामन्यात निकोलस पंजाब किंग्ज या संघातून खेळला होता. पंजाब किंग्जसाठी ७.७२ च्या सरासरीने केवळ ८५ धावा काढल्या होत्या. भारताविरूद्धच्या मालिकेत त्याने चांगलं प्रदर्शन केलं होतं. यंदाच्या मेगा लिलावात त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाने खरेदी केलं असून डावखुऱ्या फलंदाजावर पैशांचा पाऊस पडला.

पीटीआने दिलेल्या माहितीनुसार, निकोलसने हॉटेलमध्येच १५ पिझ्झांची ऑर्डर दिली होती. कारण बायो बबलमध्ये असल्यामुळे त्यांना बाहेर जेवणासाठी परवागनी नव्हती. पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर त्याच्या हॉटेलमध्ये आणण्यात आले. त्यानंतर पिझ्झा वाटप करण्यापूर्वी ते सॅनिटाईझ करण्यात आले होते.

- Advertisement -

अशी आहे हैदराबादची टीम : 

निकोलस पूरन, वॉशिंग्टन सुंदर, राहुल त्रिपाठी , भुवनेश्वर कुमार , टी नटराजन, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, फजल हक फारुकी, ग्लेन फिलिप्स, विष्णू विनोद, शशांक सिंग, सौरभ दुबे, रवी कुमार समर्थ, शॉन अॅबॉट, रोमॅरियो स्टीफर्ड, मार्को जेन्सन, एडन मार्कराम, जगदीश सुचित, श्रेयस गोपाल, प्रियम गर्ग, केन विल्यमसन, अब्दुल समद, उमरान मलिक.


हेही वाचा : पीएम मोदींनी केलेल्या वक्तव्याविरोधात खासदार गोपाळ शेट्टींच्या घराबाहेर काँग्रेसचं आंदोलन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -