घरक्रीडानिमा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव स्पर्धा

निमा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव स्पर्धा

Subscribe

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) तीन दिवसीय क्रीडा महोत्सवातील क्रिकेटच्या राज्यस्तरीय सामन्यात अखेरच्या दिवशी निमा नाशिक आणि निमा राजगुरुनगर यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात निमा राजगुरूनगर संघ विजयी ठरला. त्यांना निमा करंडक प्रदान करण्यात आला.

विजेत्या संघाला चषक आणि ३१ हजार रुपये रोख तर उपविजेता निमा नाशिक संघाला चषक व २१ हजार रुपये रोख देण्यात आले. याबरोबरच मालिकावीर डॉ. व्यंकट पाटील (निमा नांदेड) , उत्कृष्ट फलंदाज डॉ. भूषण मोगल, उत्कृष्ट गोलंदाज प्रताप सोमवंशी, उत्कृष्ट संघ निमा नांदेड यांचा विशेष गौरव केला गेला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, निमा केंद्र शाखा अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, निमा केंद्र शाखेचे खजिनदार आशुतोष कुलकर्णी, निमा केंद्र शाखेच्या वुमन फोरम अध्यक्ष साधना कुलकर्णी, राष्ट्रीय शाखेचे सहखजिनदार शैलेश निकम, निमा केंद्र शाखेचे प्रवक्ते डॉ. गजानन पडघम, राज्य शाखा अध्यक्ष डॉ. जी. एस. कुलकर्णी, केंद्रीय वेब समन्वयक डॉ. मनीष जोशी, निमा राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल निकम, निमा राज्यचे सचिव डॉ. अनिल बाजारे, उपसचिव डॉ. अनिल निकम, निमा राज्य शाखेचे खजिनदार डॉ. भूषण वाणी, निमा नाशिकच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सूर्यवंशी आदींसह निमाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

महोत्सवाच्या आयोजनकामी समन्वयक डॉ. सुजित सुराणा, डॉ. दीपक पाटील, डॉ. वैभव गरुड, डॉ. संगीत लोंढे हे जबाबदारी सांभाळत आहेत. नाशिक निमाचे सचिव डॉ. वैभव दातरंगे, खजिनदार डॉ. प्रतिभा वाघ, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. राहुल पगार, डॉ. ललित जाधव, डॉ. व्यंकटेश पाटील, डॉ. मनीष हिरे, निमा महिला फोरमच्या अध्यक्षा प्रणिता गुजराथी, दीप्ती बडे प्रयत्नशील होते.

शहिदांना मदत, वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान

- Advertisement -

या स्पर्धेदरम्यान निमाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील बीएएमएस डॉक्टरांनी जमा केलेला निधी वीर शहिदांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. यामध्ये वीर जवान रावसाहेब सोनजे, पिंपळगाव वाखेरी यांच्या वीर पत्नी आशा सोनजे आणि पुलवामा येथे शहीद झालेले वीर जवान नितीन राठोड यांच्या वीर पत्नी वंदना राठोड यांना सन्मानित करण्यात आले. निमा कायमच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होते. आता शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी निधी गोळा करून पुन्हा एकदा सामाजिक दायित्व पार पाडल्याची प्रतिक्रिया नाशिकच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -