Eco friendly bappa Competition
घर क्रीडा IPL 2022 : चारही सामन्यांत मुंबई इंडियन्सला मोठं अपयश, नीता अंबानींनी फोन...

IPL 2022 : चारही सामन्यांत मुंबई इंडियन्सला मोठं अपयश, नीता अंबानींनी फोन करून दिला हा मॅसेज

Subscribe

आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सची चांगली सुरूवात झालेली नाही. सामने सुरू झाल्यापासून मुंबईला पराभवाचा सामना करावा लागत आहे. पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला चारही सामन्यात आतापर्यंत मोठं यश मिळालेलं नाहीये. मुंबईच्या खराब सुरूवातीमुळे मुंबई इंडियन्स १० संघांच्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.

कोलकाताविरूद्ध मुंबईने सामना गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता की, ही गोष्ट बरोबर नाहीये. मुंबई इंडियन्सकडून इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये फ्रेंचायझीच्या मालक नीता अंबानी मुंबईच्या खेळाडूंना प्रोस्ताहन देत आहेत.

- Advertisement -

नीता अंबानींनी फोन करून दिला हा मॅसेज

नीता अंबानी यांनी फोन करून मुंबईच्या खेळाडूंना एक मॅसेज दिला आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या की, माझा सर्वांवर पूर्ण विश्वास आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की आपण नक्कीच पुढे जाऊ. आता आपण फक्त पुढे आणि वरच्या स्थानावर जाणार आहोत. मला यावर विश्वास आहे की, आपणच यंदाची ट्रॉफी जिंकणार आहोत.

- Advertisement -

आपण याआधीही अनेकदा अशा परिस्थितीतून पुढे गेलो आहोत, त्यामुळे आपण ट्रॉफी नक्की जिंकू. त्यामुळे तुम्ही ऐकमेकांना साथ द्याल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही ऐकमेकांसोबत राहिलात तर आपण नक्की यावर मात करू शकतो. त्यामुळे तुम्हा सर्वांना माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. कृपया करून ऐकमेकांवर विश्वास ठेवा. कारण मुंबई इंडियन्स सदैव तुमच्या पाठिशी उभी आहे, असं नीता अंबानी म्हणाल्या.

पहिल्यांदाच असं घडलेलं नाहीये…

मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या पराभवाचा सामना केलेला नाहीये. तर याआधीही ते या सर्व परिस्थितीतून बाहेर गेले आहेत. २०१४ मध्ये मुंबईने पहिले पाच सामने गमावले होते. त्यानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्सविरूद्ध पहिल्या विजयाची नोंद केली. त्या हंगामातील गट टप्प्यात १४ गुणांसह चौथ्या स्थानावर होते.

२०१५ मध्ये देखील मुंबईने पहिले चार समाने गमावले होते आणि अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत मुंबईने ट्रॉफी जिंकली होती. मुंबईचा पुढील सामना कर्णधार मयांक अग्रवालच्या पंजाब किंग्जीशी होणार आहे. तसेच हा सामना येत्या बुधवारी १३ एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.


हेही वाचा : Viral Video : महागाईच्या मुद्द्यावर स्मृती इराणींना कॉंग्रेस नेत्याने एअरपोर्टवर गाठले, म्हणाल्या महागाईसाठी…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -