Homeक्रीडाGautam Gambhir : माजी क्रिकेटरची गौतम गंभीरवर टीका; नितीश राणाचीही वादात उडी

Gautam Gambhir : माजी क्रिकेटरची गौतम गंभीरवर टीका; नितीश राणाचीही वादात उडी

Subscribe

माजी क्रिकेटपटू आणि कधीकाळी कोलकात नाइट रायडर्स संघाचा भाग असलेल्या मनोज तिवारीने गौतम गंभीरला ढोंगी म्हटले आहे. तसेच गौतम गंभीर सर्व श्रेय स्वत: घेता, असा आरोपही त्याने केला आहे. त्यांच्या या टिकेवर आता कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडूंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचा पदभार स्वीकारल्यानंतर संघाची समाधानकारक कामगिरी होताना दिसत नाहीय. त्यामुळे त्यामुळे गौतम गंभीरच्या निर्णयावर टीका होत आहे. अशातच माजी क्रिकेटपटू आणि कधीकाळी कोलकात नाइट रायडर्स संघाचा भाग असलेल्या मनोज तिवारीने गौतम गंभीरला ढोंगी म्हटले आहे. तसेच गौतम गंभीर सर्व श्रेय स्वत: घेता, असा आरोपही त्याने केला आहे. त्यांच्या या टिकेवर आता कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडूंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Nitish Rana strong response after Manoj Tiwari criticized Gautam Gambhir)

मनोज तिवारीने गौतम गंभीरवर निशाणा साधताना म्हटले की, गौतम गंभीर हा ढोंगी आहे. तो जे बोलतो ते करत नाही. मात्र सर्व श्रेय तो स्वतः घेतो. कोलकाता नाइट रायडर्सला दोन वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा गौतम गंभीरच होता का? असा प्रश्न उपस्थित करत श्रेय कोण घेतो आहे, हे सर्वांना माहित असल्याचे मनोज तिवारी याने म्हटले आहे. त्याने पुढे असेही म्हटले की, आमच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोलकाता नाइट रायडर्स संघ दोनदा चॅम्पियन बनला आहे. जॅक कॅलिस, सुनील नारायण आणि मी स्वत: महत्त्वाचे योगदान दिले आहे, असेही मनोज तिवारी याने म्हटले आहे.

39 वर्षीय मनोज तिवारीच्या टिकेनंतर युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि नितीश राणा यांनी संताप व्यक्त केला आहे. हर्षित राणा याने इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले की, एखाद्याच्या वैयक्तिक सुरक्षेमुळे एखाद्यावर टीका करणे योग्य नाही. गौतम गंभीर हा असा माणूस आहे, जो स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतो. तो नेहमीच खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या खेळाडूंच्या पाठीशी उभा राहतो. हे त्याने अनेक वेळा दाखवून दिले आहे. त्याच्याकडे भरपूर अनुभव आणि ज्ञान आहे. तो खेळ कसा बदलायचा या कलेत पारंगत आहे, असे हर्षित राणा याने म्हटले आहे.

हेही वाचा – Sunil Gavaskar : कसोटीत रोहितनंतर हा खेळाडू कर्णधार; सुनील गावस्करांकडून भविष्यवाणी

तथ्यांवर आधारीत टीका असावी

मनोज तिवारीच्या टिकेनंतर नितीश राणा याने वादात उडी घेतली असली तरी त्याने गौतम गंभीरची पाठराखण केली आहे. त्याने म्हटले की, टीका ही तथ्यांवर आधारित असावी, वैयक्तिक असुरक्षिततेबद्दल नसावी. मी आतापर्यंत भेटलेल्या सर्वात निस्वार्थी खेळाडूंपैकी गौतम गंभीर हा एक आहे. कठीण काळात तो इतर कोणासारखी जबाबदारी घेताना दिसत नाही. त्यामुळे चांगल्या प्रदर्शनाला प्रसिद्धीची गरज नसते, तर ट्रॉफी स्वत: सर्वकाही सांगत असते, असा टोला नितीश राणा याने लगावला आहे.

गौतम गंभीरची कामगिरी

दरम्यान, गौतम गंभीरबद्दल सांगायचे झाले, तर तो भारताच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. तो 2007 च्या टी-20 विश्वचषक आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. याशिवाय कर्णधार म्हणून गौतम गंभीरने कोलकाता नाइट रायडर्स संघाला आयपीएलमध्ये दोनदा विजेतेपद पटकावून दिले आहे. कोलकाता संघातून बाहेर पडल्यानंतर तो आयपीएल 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता, हा संघ या हंगामात तिसऱ्या क्रमांकावर राहिला. यानंतर गौतम गंभीर 2024 मध्ये पुन्हा कोलकाता संघाशी जोडला गेला आणि त्याने संघाला चॅम्पियन बनवले.