घरक्रीडाPKL Auction 2021: प्रदीप नरवाल ठरला सर्वात महागडा खेळाडू

PKL Auction 2021: प्रदीप नरवाल ठरला सर्वात महागडा खेळाडू

Subscribe

यूपी योद्धाला १.६५ कोटी रुपयाला विकला

भारताची प्रसिद्ध प्रो कबड्डी लीग पुन्हा एकदा सुरू होणार आहे. पीकेएलच्या नवीन हंगामासाठी लिलाव प्रक्रियाही सुरू झाली आहे. लीगच्या आठव्या हंगामाच्या लिलावात यावेळी अनुभवी खेळाडू प्रदीप नरवालने इतिहास रचला आहे. तो आता प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. सोमवारी झालेल्या लिलावात तो एक कोटी ६५ लाख रुपयांसह यूपी योद्धामध्ये सामील झाला आहे.

शिवाय, तेलुगू टायटन्सने त्याच्या ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीपासून १.३० कोटी रुपयांना खेळाडू कायम ठेवल्यानंतर सिद्धार्थ देसाई पीकेएल लिलावात दुसरा महागडा खेळाडू ठरला. तसेच पीकेएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी २२ परदेशी खेळाडू विकले गेले आहेत. मोहम्मदरेझा शादलोई चियानेह ‘पाटणा पायरेट्स’ला ३१ लाख रुपयांना विकले गेले, तर अबोझर मोहजर्मिघानीला ‘बंगाल वॉरियर्स’ने ३०.५ लाख रुपयांना विकले.

- Advertisement -

यापूर्वी, पीकेएलच्या सहाव्या हंगामात, मोनू गोयतने सर्वात महागड्या खेळाडूचा विक्रम केला होता, जेव्हा त्याला ‘हरियाणा स्टीलर्स’ने १.५१ कोटी रुपयांमध्ये घेतले होते.

आगामी पीकेएल हंगामासाठी अव्वल पाच भारतीय खेळाडू- यूपी योद्धाने घेतलेला प्रदीप नरवाल (१.६५ कोटी रुपये ), तेलुगू टायटन्सने घेतलेला सिद्धार्थ देसाई (१.३० कोटी रुपये), तमिळ थलाइवाजने घेतलेला मंजीत (९२ लाख रुपये), सचिन (८४ लाख ) पाटणा पायरेट्सने घेतला, तर रोहित गुलिया (८३ लाख रुपये) हरियाणा स्टीलर्सने घेतला.

- Advertisement -

प्रदीप नरवालने २०१५ मध्ये बेंगळुरू बुल्ससोबत लीगमध्ये पदार्पण केले होते. नरवाल जेव्हा पाटणा पायरेट्ससोबत होता तेव्हा त्याने यशाची पायरी चढली. पटना पायरेट्सबरोबरच्या त्याच्या काळात त्याने अनेक गुणांचे विक्रम मोडले आहेत आणि सध्या प्रो कबड्डी लीगमध्ये सर्वाधिक गुण मिळवत रेडरच्या यादीत सर्वातवर आहे.

पीकेएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनल्यानंतर नरवाल म्हणाला, “मी धन्य आहे की, यूपी योद्धाने मला पहिल्यांदा लिलावात दखल घेतली. मला १.५० कोटींपेक्षा जास्त निवडले जाण्याची अपेक्षा होती आणि मला जे वाटले ते घडले.”


हेही वाचा – Cristiano Ronaldoचा जुव्हेंटस क्लबला बायबाय…


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -