IPL 2022 : टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूचं आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय करिअर एकाचवेळी संपलं, १० संघांनी दाखवला रेड सिग्नल

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाची प्रक्रिया पार पडली आहे. आयपीएलच्या लिलावात काही खेळाडूंचं नशीब फळफळलं आहेत. तर काहींना सर्व संघांनी मिळून ठेंगा दाखवला आहे. टीम इंडियातील दिग्गज खेळाडू सुरेश रैना, एस श्रीसंत यांसारख्या खेळाडूंना आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर आता टीम इंडियातील अजून एका खेळाडूला डच्चू देण्यात आला आहे.

टीम इंडियातील ओपनिंग फलंदाज मुरली विजयला आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलच्या करिअरमधून बाहेर टाकण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून मुरली विजयला संघात जागा मिळालेली नाही. एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. मुरली विजय एकेकाळी संघातील विश्वासू खेळाडू होता. डिसेंबर महिन्यातील २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात मुरली विजयने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर रोहित शर्मा आणि मयंक अग्रवालने त्याचा पत्ता पूर्णपणे कट केला आहे.

आयपीएल ऑक्शनमध्ये मुरली विजयला एकाही संघाने खरेदी केलं नाही. यंदाच्या लिलावातही विजयने आपले नाव दिले होते. पण तो कोणत्याही संघाला पसंत पडलेला नाहीये. २०१८ ते २०२० या कालावधीत ६ रिक्त आयपीएल सामने विजयने खेळले होते. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधील सामन्यांत मुरली विजय तेवढा अॅक्टिव्ह दिसला नाही. त्यामुळे आता आगामी काळात हा खेळाडू कोणत्याही संघाच्या वतीने आयपीएल खेळताना दिसणार नाहीये.

कोणीही बोली न लावलेले खेळाडू कोण?

यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या हंगामात सलामीवीर फलंदाज सुरेश रैना आणि स्टीव्ह स्मिथसह अजून दोन खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. यंदाच्या आयपीएलच्या सिझनमध्ये सुरेश रैनाला सीएसकेने रिटेन केले नाही. पण आयपीएल २०२२ च्या लिलाव प्रक्रियेत सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकीब अल हसन, डेव्हिड मिलर या खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. दुसरीकडे शाकीब अल हसन सारख्या बांगलादेशच्या अनुभवी ऑलराऊंडरलाही बोली प्रक्रियेत स्थान मिळाले नाही. तर ऑस्ट्रेलियाचा मोठा फलंदाज असलेला स्टीव्ह स्मिथही विकला गेला नाही.


हेही वाचा : Narayan Rane : राणेंच्या निवासस्थानासमोर भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी, काँग्रेसचे ५० कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात