Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : 'तुझ्यापासून हे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही!' अर्जुनवर टीका करणाऱ्यांना साराचे प्रत्युत्तर 

IPL 2021 : ‘तुझ्यापासून हे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही!’ अर्जुनवर टीका करणाऱ्यांना साराचे प्रत्युत्तर 

खेळाडू लिलावात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने खरेदी केले.

Related Story

- Advertisement -

आयपीएलच्या आगामी मोसमाआधीचा खेळाडू लिलाव नुकताच पार पडला. या लिलावात अर्जुन तेंडुलकरला २० लाख रुपयांत मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले. सुरुवातीला अर्जुनचे नाव लिलावात घेतले गेले नाही. त्यामुळे त्याला कोणताही संघ खरेदी करणार नाही असे वाटू लागले होते. मात्र, लिलावाच्या शेवटच्या सत्रात अर्जुनवर मुंबईने बोली लावून त्याला आपल्या संघात घेतले. अर्जुनने याआधी मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याला मुंबईला खरेदी करेल अशी शक्यता लिलावाच्या आधीही वर्तवली होती. मात्र, अर्जुनला त्याच्या कामगिरी किंवा क्षमतेमुळे नाही, तर तो केवळ सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने त्याला आयपीएलमध्ये संधी मिळत असल्याची टीका सोशल मीडियावर करण्यात आली. मात्र, या टीकेला अर्जुनची बहीण साराने चोख प्रत्युत्तर दिले.

arjun, sara tendulkar
अर्जुन आणि सारा तेंडुलकर

साराने केले अर्जुनचे अभिनंदन

- Advertisement -

अर्जुनला मुंबई इंडियन्सने संघात घेतल्यावर इंस्टाग्रामवरून साराने त्याचे अभिनंदन केले. ‘हे यश तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही,’ असे तिने अर्जुनचे अभिनंदन करताना लिहिले. अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याच्यात फलंदाजी करण्याचीही क्षमता आहे. अर्जुनने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ही स्पर्धा खेळल्यामुळेच तो खेळाडू लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरला.

- Advertisement -