घरक्रीडाTokyo Olympics : उत्तर कोरियाची 'या' कारणाने ऑलिम्पिकमधून माघार

Tokyo Olympics : उत्तर कोरियाची ‘या’ कारणाने ऑलिम्पिकमधून माघार

Subscribe

टोकियो ऑलिम्पिक २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. 

उत्तर कोरियाने यावर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आम्ही ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नसल्याचे उत्तर कोरियाच्या क्रीडा मंत्रालयाकडून सांगण्यात आले. शीत युद्धाला विरोध दर्शवण्यासाठी उत्तर कोरियाने १९८८ सियोल ऑलिम्पिकमधून माघार घेतली होती. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी न होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असणार आहे.

दक्षिण कोरियासाठीही धक्का

उत्तर कोरियाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेणे हा दक्षिण कोरियासाठीही धक्का आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात तणावपूर्ण संबंध आहेत. मात्र, ऑलिम्पिकमध्ये हे दोन देश एकत्र खेळतील अशी उत्तर कोरियाचे पंतप्रधान मून जे-इन यांना आशा होती. तसेच २०३२ ऑलिम्पिक या दोन देशांमध्ये व्हावा यासाठीही मून प्रयत्नशील होते. मून आणि उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किम जोंग उन यांचे यावर एकमतही झाले होते. मात्र, आता उत्तर कोरियाने टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतल्याने या योजनांवर प्रश्नचिन्ह आहेत.

- Advertisement -

२३ जुलैपासून ऑलिम्पिक

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा मागील वर्षी पार पडणार होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला ही स्पर्धा पुढे ढकलणे भाग पडले. त्यामुळे आता ही स्पर्धा यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -