घरक्रीडापांड्या-राहुलला लोकपालाकडून नोटीस

पांड्या-राहुलला लोकपालाकडून नोटीस

Subscribe

बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश

भारताचे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यामुळे आता त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लोकपाल डी. के. जैन यांनी दिले आहेत. त्या कार्यक्रमात आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर पांड्या आणि राहुल यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यामुळे बीसीसीआयने त्यांच्यावर निलंबनाचीही कारवाई केली होती. पण, त्यांनी माफी मागितल्यानंतर बीसीसीआयने या दोघांना पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली. मात्र, या दोघांपुढील अडचणी अजून संपलेल्या नसून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकपालांनी या दोघांना नोटीस बजावली आहे.

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना साक्ष देण्यासाठी मागील आठवड्यात नोटीस पाठवली आहे. नियमानुसार मला त्यांचीही बाजू ऐकावी लागणार आहे. आता साक्ष द्यायला कधी यायचे याचा निर्णय त्यांनी घ्यावा, असे जैन यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

सध्या हे दोघेही आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने पांड्याचा संघ मुंबई इंडियन्स आणि राहुलचा संघ किंग इलेव्हन पंजाब यांच्याशी चर्चा केली आहे का आणि हे संघ या दोघांना साक्ष देण्यासाठी कधी हजर राहू देणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, ११ एप्रिल रोजी मुंबई आणि पंजाब यांच्यात मुंबईमध्ये सामना होणार आहे. त्यावेळी हे दोघे आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याची शक्यता आहे. याबाबत एक बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला, हे दोघेही आयपीएलमध्ये खेळत आहेत आणि या स्पर्धेचे सतत सामने होत आहेत, तसेच त्यांना खूप प्रवासही करावा लागत आहे.

जैन यांच्याकडे माजी कर्णधार सौरव गांगुलीविरुद्धही तक्रार करण्यात आली आहे. सध्या गांगुली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ दिल्ली कॅपिटल्सचा सल्लागार म्हणून काम करत आहे. मात्र, बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (सीएबी) अध्यक्षपद सांभाळत असताना गांगुलीने दिल्लीच्या सल्लागाराची भूमिका स्वीकारली असल्याने बंगालच्या दोन क्रिकेटप्रेमींनी ही तक्रार नोंदवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -