Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Australian Open : नोवाक जोकोविच अंतिम फेरीत; कारात्सेवला केले पराभूत 

Australian Open : नोवाक जोकोविच अंतिम फेरीत; कारात्सेवला केले पराभूत 

जोकोविचने आतापर्यंत तब्बल ८ वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले आहे.

Related Story

- Advertisement -

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात रशियाच्या अस्लन कारात्सेवला ६-३, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. कारात्सेवला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले असले तरी त्याने या स्पर्धेत अनोखा विक्रम रचला. आपल्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतच उपांत्य फेरी गाठणारा कारात्सेव हा ओपन एरामधील पहिला खेळाडू ठरला. गतविजेत्या जोकोविचने मात्र उपांत्य फेरीत कारात्सेवला ६-३, ६-४, ६-२ असे पराभूत केले.

१८ व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या शोधात

- Advertisement -

रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत जोकोविचसमोर ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपास आणि रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्ह यांच्यापैकी एका खेळाडूचे आव्हान असेल. जोकोविच आता १८ व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या शोधात असून त्सीत्सीपास आणि मेदवेदेव्ह यांना अजून एकदाही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही. जोकोविचने आतापर्यंत तब्बल ८ वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले असून सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये तो अव्वल स्थानावर आहे.

ओसाकाची सेरेनावर मात

महिलांमध्ये तिसऱ्या सीडेड जपानच्या नाओमी ओसाकाने अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य फेरीत अमेरिकेची महान खेळाडू सेरेना विल्यम्सवर ६-३, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली. ओसाकाने २०१९ मध्ये ही स्पर्धा जिंकली असून यंदा अंतिम फेरीत तिचा सामना अमेरिकेच्या जेनिफर ब्रेडीशी होईल.


- Advertisement -

हेही वाचा – आयपीएल लिलावात कोणत्या संघाने कोणाला केले खरेदी, जाणून घ्या!


 

- Advertisement -